Vaishnavi Hagawane Case Saam Tv
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: वैष्णवीचे सासरे आणि दिराला अखेर अटक, ७ दिवसांपासून होते कुठे?

Vaishnavi Hagawane Case Update: वैष्णवी हगवणे प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचे सासरे आणि दिराला अटक केली आहे. दोघेही ७ दिवसांपासून फरार होते.

Priya More

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या सात दिवसांपासून फरार असणारे वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशिल हगवणे यांना पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. राजेंद्र आणि सुशिल हगवणे यांना पोलिसांनी एका गावातून अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेचे व्हिडिओ समोर आले आहेत.

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील फरार दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना पहाटे अटक करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांनी स्वारगेट परिसरातून त्यांना अटक केली. गेल्या सात दिवसांपासून हे आरोपी फरार झाले होते. फरार असताना हे आरोपी सतत आपले ठिकाण बदलत होते.

१७ मे रोजी या आरोपींनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये जेवण केले. या हॉटेलमध्ये ते काही मित्रांसोबत जेवण करताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. याचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. या दोन्ही फरार आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे मोठे आव्हान पिंपरी चिंचवड शहर पोलिसांसमोर होतं. मात्र आज अखेर या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

वैष्णवी हगवणेने आपल्या सासरच्या मंडळींकडून होणारा छळ, मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून १६ मे रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर बावधन पोलिसांनी गुन्हा दाखल करत वैष्णवीची नवरा शशांक, सासू लता आणि नणंद ऐश्वर्याला अटक केली होती. पण वैष्णवीचे सासरा राजेंद्र आणि दीर सुशिल फरार होते. गेल्या ७ दिवसांपासून पोलिस त्यांचा शोध घेत होते. अखेर त्यांना आज पहाटे दोघांना बेड्या ठोकल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT