Hagawane case Saam
मुंबई/पुणे

Vaishnavi Hagawane: चांदिच्या गौराई, सोन्याच्या अंगठ्या अन् मिठाईचे बॉक्स, कस्पटे कुटुंबाकडून वैष्णवी-शशांकला भेट; VIDEO व्हायरल

Vaishnavi Hagavane Case: पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातनंतर नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये वैष्णवीच्या आई-वडिलांनी गणेशोत्सवाच्या काळात तिला चांदीच्या गौराई, मिठाईचे बॉक्स आणि इतर भेटवस्तू दिल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे.

Bhagyashree Kamble

पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे व्हिडिओ समोर आले असून, या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत. या व्हिडिओंमध्ये वैष्णवीच्या आई-वडिलांनी गणेशोत्सवाच्या काळात तिला चांदीच्या गौराई, सोनं - चांदीच्या अंगठी भेट म्हणून दिल्याचे दृश्य दिसत आहे. तसेच, भेटवस्तू आणि मिठाईचे बॉक्सही या व्हिडिओंमध्ये दिसत आहेत.

या व्हिडिओंमुळे हगवणे कुटुंबाकडून कस्पटे कुटुंबाकडून हुंड्यासाठी पैसे आणि दागिन्यांची मागणी सुरूच होती, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणीसोबतचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता, ज्यात ती सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाबाबत सांगत आहे. हगवणे कुटुंबाने देखील पैसे आणि महागड्या वस्तूंसाठी छळ केला असल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपी अटकेत आहेत. कोर्टात दोन्ही बाजूने युक्तिवाद सुरू असून, तपास सुरू आहे. या व्हिडिओंमुळे प्रकरणात नवीन वळण आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

कोर्टात नेमकं काय घडलं?

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपींना बुधवारी पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्ष आणि हगवणे पक्षातील युक्तीवादानंतर न्यायालयाने वैष्णवीचा पती शशांक हगवणे, नणंद करिश्मा हगवणे आणि सासू लता हगवणे यांना एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. तर राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या बाप-लेकांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिले आहेत.

विशेष म्हणजे, या सुनावणीदरम्यान आरोपींच्या वकिलांनी वैष्णवीवर गंभीर आरोप करत तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. वैष्णवी नको त्या व्यक्तींशी चॅट करत होती, तिचे चॅट पकडले गेले होते, असा संतापजनक दावा त्यांनी केला. हगवणे कुटुंबावर अमानुष छळ आणि मारहाणीचे आरोप असताना, बचाव पक्षाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून, पुढील सुनावणी लवकरच होणार असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT