Pune  ज्ञानेश्वर हिंगोलीकर
मुंबई/पुणे

वैशाली नागवडे मारहाण प्रकरणी आज राष्ट्रवादीचं पुण्यात मुक आंदोलन

राष्ट्रवादीचं पुण्यात मुक आंदोलन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: भाजप कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या (NCP) महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुण्यात (Pune) मूक निषेध आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस (Congress) आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकत्र येऊन आंदोलनात सहभागी होणार आहेत. पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्यासमोर मूक आंदोलन होत आहे.

हे देखील पाहा-

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात भाजप (BJP) कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुण्यात मूक निषेध आंदोलन सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सध्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यातील बालगंधर्व जवळील झाशीच्या राणी पुतळ्यासमोर मूक निषेध आंदोलन सुरू आहे. पोलिसांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला पदाधिकारी यांना झालेल्या मारहाणीनंतर (beating) पोलिसांनी (police) खबरदारी म्हणून आज पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

महिलांना मारहाण करणा-यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, ”भाजप कार्यकर्त्यांचे करायचे का, खाली डोके वर पाय”, ”महिलांना मारहाण करणा-या भाजप कार्यकर्त्यांचा धिक्कार असो” अशा जोरदार घोषणा यावेळी आंदोलक देत आहेत. स्मृती इराणी प्रमुख पाहुण्या असलेल्या कार्यक्रमामध्ये सोमवारी गोंधळ झाला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महागाईच्या विरोधात काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. कार्यक्रमाच्या दरम्यान राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केल्याने सभागृहामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील राजुरामध्ये मतचोरी कशी झाली?, राहुल गांधींनी सांगितली संपूर्ण प्रोसेस

Maharashtra Live News Update: राहुल गांधींचा बॉम्ब फुसका, भाजप नेत्याचा पलटवार

Heavy Rain : बार्शी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले; चांदनी नदीला महापूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली

'ये तो ट्रेलर हैं' थोड्याच वेळात राहुल गांधींकडून हायड्रोजन बॉम्ब फुटणार, काय खुलासा करणार?

Purandar Fort History: ऐतिहासिक, स्थापत्य आणि सांस्कृतिक पुरंदर किल्ला; वाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT