Vadhavan Port Saam Digital
मुंबई/पुणे

Vadhavan Port : वाढवण बंदरामुळे मोठा 'घोळ'; समुद्रातलं 'सोनं' लुप्त होणार?

Vadhavan Port Ghol Fish : वाढवण बंदराला पालघरसह गुजरातमधील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. सगळ्यात घोळ मासा सर्वात मोठं कारण ठरल आहे. वाढवण बंदर हे समुद्री सोनं म्हटलं जाणाऱ्या घोळ माशांचं माहेरघर आहे.

Sandeep Gawade

72 हजार कोटी रुपयांचा खर्च, 12 लाख तरुणांना रोजगार, 9 कंटेनर टर्मिनल अशी वैशिष्ट्ये असलेल्या वाढवण बंदराचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं, मात्र या बंदराला पालघरसह गुजरातमधील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. त्याला कारणंही तसेच आहेत. सगळ्यात मोठं कारण ठरलंय ते घोळ माशाचं ...वाढवण बंदर हे समुद्री सोनं म्हटलं जाणाऱ्या घोळ माशांचे माहेरघर आहे. माशांच्या आणि खेकड्यांच्या अनेक प्रजाती, ऑयस्टर आणि प्रवाळ यांची इथं पैदास होते. माशांच्या प्रजननावर आणि सहजीवनावर या महाकाय बंदर विकासाचा परिणाम होणार असल्याचा आरोप स्थानिक मच्छीमारांनी केलाय..

घोळ माशाची वैशिष्ट्ये?

वाढवणचे बंदर घोळ माशांचे माहेरघर

घोळ भारतातील सर्वात महाग मासा

एका घोळ माशाची किंमत अंदाजे 5 लाख रुपयांपर्यंत

माशाला चीनसह इतर आशियाई बाजारपेठेत मोठी मागणी

माशापासून औषधी आणि उपयुक्त पदार्थांची निर्मिती

बिअर आणि वाईन बनवण्यासाठी घोळ माशाचा वापर

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेलं वाढवण बंदर हे भारतातील सर्वात मोठ्या खोल जल बंदरांपैकी एक असणार आहे. हे बंदर अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज असेल. मात्र वाढवणची निवड का करण्यात आली त्याची काय कारणं आहेत पाहूया....

वाढवणची निवड का?

देशातील सर्वात मोठं आणि जगातलं दहाव्या क्रमांकांचं बंदर

नैसर्गिक खोलीमुळे मोठ्या जहाजांचा मार्ग सुकर

मध्य-पूर्व आणि युरोपमध्ये माल वाहतूक सोपी होणार

आयातीसाठी लागणारा वेळ आणि खर्चात मोठी बचत

बंदरामुळे स्थानिकपातळीवर एक लाख नोकऱ्यांचा दावा

वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन्ही राज्यातील सागरी भागात घोळ आणि सिल्वर पापलेट माशांचे मोठे प्रजनन होते. मात्र, वाढवण बंदरामुळे हे दोन्ही मासे धोक्यात येणार आहेत, असे मच्छीमारांचे म्हणणे आहे. त्यामुळे याठिकाणचा समुद्रातल्या नैसर्गिक साधनसपत्तीचं संवर्धन करण्यासाठी पावलं उचलायला हवीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

HBD Virat Kohli: महागड्या गाड्या, अलिशान घर; दिवसाला कमावतो 5 कोटी! विराटची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT