Vadhavan Port Ghol Fish : १५००० रुपयांना फक्त १ किलो, घोळ मासा इतका महाग का? वाढवण बंदराशी काय आहे कनेक्शन?

Ghol Fish Price : वाढवण बंदर आणि डहाणू खाडी परिसरात आढळणाऱ्या घोळ माशाला त्याच्या मांस आणि एयर ब्लॅडरमुळे विशेष मागणी. बिअर आणि वाईन बनवण्यासाठी या माशाचा वापर केला जातो. या माशाचं १ किलो मासं जवळपास १५००० रुपयांना विकलं जातं.
Vadhavan Port Ghol Fish
Vadhavan Port Ghol FishSaam Digital
Published On

किनारपट्टीवरील नागरिकांच्या रोजच्या आहारातील मुख्य पदार्थ सी-फूड म्हणजेच मासे... मासा पचायला सोपा, रुचकर आणि चिकन मटनच्या प्रमाणात फॅटचं प्रमाण कमी असल्यामुळे अलीकडे माशाला जगभरात मोठी मागणी असते...त्यामुळे मटन, चिकनपेक्षा माशांच्या किमतीही प्रचंड वाढल्या आहेत...मात्र तुम्ही १५००० रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या माशाविषयी ऐकलंय का?...ज्याच्या एका पिल्लाची किंमत तब्बल ५००००० रुपये असल्याचं सांगितलं जातं... असा हा मासा तोही आपल्या महाराष्ट्रात सापडतो...मात्र अशा या दुर्मिळ माशावर मोठं संकट ओढवलं आहे. काय आहे नेमकं कारण, पाहूयात एक रिपोर्ट

Vadhavan Port Ghol Fish
Explainer : वाढवण बंदराला मच्छिमारांचा का होतोय विरोध, कारणे काय? स्थानिकांचं म्हणणं वाचा

पालघर जिल्ह्यातील डहाणू शहराजवळ असलेले वाढवण बंदर एका खास गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. समुद्रातील माशांसाठी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील हे खास ठिकाण आहे. हजारो मासे या बंदराच्या परिसरात प्रचननासाठी येतात. त्यात भारताच्या किनारपट्टीवर सापडणाऱ्या मोठ्या माशांपैकी एक असलेल्या घोळ माशाचाही समावेश आहे. या माशात औषधी गुणधर्म आढळतात, त्यामुळे त्याला मोठी मागणी असते. समुद्राच्या एका विशिष्ट पट्ट्यातच घोळ मासा पकडला जातो कारणं त्यांचं प्रजननाचं एक विशिष्ट ठिकाण आहे. वाढवण बंदर आणि किनाऱ्याला लागून २० मीटरची खोल पट्टी आहे. आणि या बंदरालाचं लागून डहाणू खाडीचा अधिवास आहे.

माशाचा रंग साधारण सोनेरी असतो. चव आणि आरोग्यदायी गुणधर्मांमुळे याला मोठी मागणी आहे. चीन आणि इतर आशियाई देशांच्या बाजारपेठेत मोठी मागणी असून माशाचे मांस युरोपियन आणि मध्य-पूर्व देशांमध्ये निर्यात केलं जातं. गुजरातमध्ये एक किलो घोळ माशाची किंमत 5,000 ते 15,000 रुयांपर्यंत आहे. याच माशांची मासेमारी करणारे मच्छिमार करोडो रुपये कमवतात, त्यामुळे घोळ माशाला'सी गोल्ड'असंही म्हटलं जातं.

Vadhavan Port Ghol Fish
PM Narendra Modi Speech : छत्रपती शिवरायांची माफी ते सावरकरांवरून विरोधकांना सवाल; PM नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील १० ठळक मुद्दे, वाचा

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर आढळणाऱ्या घोळ माशाला त्याच्या मांस आणि एयर ब्लॅडरमुळे विशेष मागणी आहे. बिअर आणि वाईन बनवण्यासाठीही या माशांचा वापर केला जातो. एयर ब्लॅडर हे ओषधामध्ये वापरलं जातं. त्यामुळे या माशाचं मासं आणि एयर ब्लॅडरची वेगवेगळी विक्री होते आणि त्याची निर्यात मुंबईतून होते.

सध्या याचं परिसरात ७६००० कोटीच्या निधीतून वाढवण बदराचा विकास केला जात आहे. इतक्या मोठ्या प्रकल्पामुळे आणि आजूबाजूचा भागाचा विकास झाल्यामुळे घोळ माशाचीही दुर्मिळ प्रजात नष्ट होऊ शकते, असं पर्यावरणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवाय जगभरातील घोळ माशांच्या अधिवासाची ठिकाणं संरक्षित करण्यात आली आहेत, मग आपल्या देशात का नाही असा सवालही तज्ज्ञांनी केला आहे. शिवाय हजारो मच्छिमारांच्या उदरनिर्वाहाचं साधन हिरावून घेतलं जाणार असल्याचा आरोप होत आहे.

Vadhavan Port Ghol Fish
PM Modi At Fintech Fest: 'सरस्वती बुद्धी वाटत होती तेव्हा...', PM मोदींचे विरोधकांवर टीकास्त्र; 'ग्लोबल फिनटेक फेस्ट' कार्यक्रमात काय म्हणाले? वाचा...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com