Ulhasnagar
Ulhasnagar Saam TV
मुंबई/पुणे

Measles Disease: उल्हासनगरात गोवर सदृश्य बालक आढळल्याने खळबळ, लसीकरण मोहीम सुरू

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> अजय दुधाणे

कल्याण : उल्हासनगर शहरात गोवर सदृश्य आजाराची लागण झालेलं बालक आढळून आलं आहे. या बालकावर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचार करून त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. यानंतर शहरात गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

राज्यात सध्या गोवरचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. हा आजार लहान बालकांच्या जीवावर बेतू शकत असल्यामुळे पालकांमध्ये काळजीचं वातावरण आहे. अशातच उल्हासनगर शहरात एका नऊ महिन्यांच्या बालकात गोवर सदृश्य आजाराची लक्षणं आढळून आली होती.

या बालकावर उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात आठ दिवस उपचार करण्यात आले आणि त्याला डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्याचा गोवरचा रिपोर्ट अजूनही पॉझिटिव्ह आलेला नसल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली.

सोबतच शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात येणाऱ्या बालकांसाठी गोवर प्रतिबंधक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली आहे. तसेच आत्तापर्यंत २८४ बालकांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

तर सध्या रुग्णालयात ४३५ लसींचा साठा असल्याचं डॉ. मनोहर बनसोडे यांनी सांगितलं. गोवरचा सध्याचा वाढता प्रादुर्भाव पाहता या आजारासाठी १० बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : पंतप्रधान मोदींचा आज पुण्यात मुक्काम

Maharashtra Election: इंडिया आघाडीचं सरकार आलं तर कोण होणार पंतप्रधान? पटोलेंनी उघडं केलं गुपित

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

ED, CBI तुमच्या हातातील बाहुले होते, मग तुम्ही 2014 ची निवडणूक का हारले; काँग्रेसच्या आरोपांवर PM मोदी संतापले

Pankaja Munde News | घोषणा देणाऱ्या आंदोलकांशी मुंडेंचा संवाद!

SCROLL FOR NEXT