US Iran Israel War Engineer Die saam tv
मुंबई/पुणे

Iran Israel War : इराणकडून तेलाच्या जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; १५ जण बचावले

US Iran Israel War Engineer Die : इराकच्या बसरा बंदराजवळ अमेरिकन तेल टँकरवर हल्ला झाला. या हल्ल्यात भारतीय इंजिनिअर नंदन प्रसाद सिंह यांचा मृत्यू झाला असून १५ भारतीय क्रू मेंबरची सुरक्षित सुटका करण्यात आली.

Alisha Khedekar

  • इराण-इस्त्राईल युद्धाच्या पार्श्वभूमीवर बसरा बंदराजवळ तेल टँकरवर हल्ला

  • हल्ल्यात भारतीय इंजिनिअर नंदन प्रसाद सिंह यांचा मृत्यू

  • १५ भारतीय आणि १२ फिलिपिनो नागरिकांची सुरक्षित सुटका

  • स्फोटकांनी भरलेल्या स्पीडबोटने टँकरला धडक दिल्याची शक्यता

  • भारतीय दूतावासाने घटनेची माहिती सोशल मीडियावर दिली

Indian Engineer Nandan Singh Killed After Attack On Oil Tanker Basra मागील दोन आठवड्यापासून जगात सुरु असलेल्या इराण इस्त्राईल युद्ध दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. या युद्धाची झळ भारतीयांच्या किचनपर्यंत गेली आहे. तसेच पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांना देखील त्याचा फटका बसला आहे. अमेरिकन तेल टँकर सेफसी विष्णूवर बुधवारी इराणने हल्ला केला. या हल्ल्यात टँकरवर काम करणाऱ्या एका भारतीय इंजिनिअरचा मृत्यू झाला. मृत इंजिनिअरचे नाव नंदन प्रसाद सिंह आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,नंदन प्रसाद सिंह हे मूळचे बिहारचे होते. गेल्या काही वर्षापासून ते कुटुंबासह मुंबईतील कांदिवलीत राहायला आले होते. त्यांच्या पश्चात् पत्नी आणि २ मुले आहेत. नंदन सिंह आधी नियोम मॅरिटाइम, यूनाइटेड ओशन शिप मॅनेजमेंट, बर्नार्ड शुल्टे शिप मॅनेजमेंट, सॅमसन मॅरिटाइम आणि शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये कामाला होते.

इराकच्या बसरा येथील खोर अल जुबैर बंदराजवळ बुधवारी हल्ला झाला. यावेळी एका जहाजातून दुसऱ्या जहाजात ४८ हजार मेट्रिक टन नेफ्था भरले जात होते. एक अज्ञात वस्तू त्याला धडकली असं शिपिंग मंत्रालयाकडून सांगण्यात आले. सुरुवातीच्या रिपोर्टमध्ये या जहाजाला सफेद रंगाची विना ड्रायव्हर स्पीडबोटने हल्ला केल्याचे समोर आले. या स्पीड बोटीत विस्फोटके होती. जहाज उजव्या बाजूने आले आणि जोरात धडकले. त्यामुळे जहाजावर भीषण आग लागली.

आगीपासून बचाव करण्यासाठी जहाजातील नागरिकांनी पाण्यात उडी मारली. त्यानंतर काही अंतरावर एक STS टगद्वारे त्यांना वाचवण्यात आले. इराकच्या कोस्ट गार्डने २७ जणांना सुरक्षित वाचवले. त्यात १५ भारतीय आणि १२ फिलिपिनो नागरिकांचा समावेश होता. या सर्वांना सुरक्षित बसरा बंदरावरील एका छोट्या बेटावर पोहचवण्यात आले. त्यानंतर भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर माहिती देत म्हटले की, ११ मार्च २०२६ रोजी मार्शल आयरलँड्स झेंडा असणाऱ्या अमेरिकन तेल टँकर सेफसी विष्णूवर बसराजवळ हल्ला झाला. ज्यात एका भारतीय क्रू मेंबरचा जीव गेला तर इतर १५ भारतीयांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्यात यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Cylinder: वेळीच व्हा सावध! गॅस बुकिंच्या नावाखाली बँक अकाऊंट होतंय रिकामं; या चूका टाळा

Coconut Water Vs Sugarcane Juice: नारळ पाणी की उसाचा रस, उन्हाळ्यात कोणता ज्यूस शरीरासाठी फायदेशीर?

Maharashtra Live News Update: जळगावातील जिल्हा न्यायालयात बुलेटने अचानक पेट घेतला

Beed: संतोष देशमुख हत्या प्रकरण, आरोपी जयराम चाटे १४ महिन्यानंतर जेल बाहेर

Gudi Padwa 2026: गुढीपाडवा का साजरा केला जातो? 2026 ची तारीख आणि महत्त्व जाणून घ्या

SCROLL FOR NEXT