Yashshree Shinde chasing accused Dawood Shaikh Saam TV
मुंबई/पुणे

Yashshree Shinde News : यशश्री शिंदेच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर; आरोपी दाऊद करत होता पाठलाग

Uran Yashashri Shinde Case : यशश्री शिंदे हिच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करत असल्याचं दिसून येतंय.

Satish Daud

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबईतील उरण परिसरात यशश्री शिंदे या २२ वर्षीय तरुणीची एका नराधमाने अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. हत्येनंतर आरोपी दाऊद शेख हा फरार झाला आहे. पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, यशश्री शिंदे हिच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करत असल्याचं दिसून येतंय.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, की यशश्री शिंदे ही रस्त्याने जाताना दिसून येत आहे. त्याचवेळी आरोपी दाऊद हा तिचा पाठलाग करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. दरम्यान, यशश्री शिंदेच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केलाय.

आरोपी दाऊद याच्यावर लवकरात लवकर कारवाई करा, तसेच हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशी द्या, अशी मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. आरोपीसोबत आमच्या मुलीचे प्रेमसंबंध होते, अशी खोटी माहिती पसरवली जात असून आहे. त्यामुळे आमची बदनामी थांबवा अशी विनंती यशश्रीच्या आई-वडीलांनी केली आहे.

दाऊदने यशश्रीची हत्या का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दाऊद हा अनेक दिवसांपासून यशश्रीच्या पाठीमागे लागला होता. त्याने २०१९ मध्ये यशश्रीला त्रास देखील दिला होता. तेव्हा पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी दाऊदला जेलमध्ये देखील जावे लागले होते. याच गोष्टीचा राग आरोपी दाऊदच्या मनात होता.

तेव्हापासून ते यशश्रीला त्रास देत होता. पण तिने याबाबत कुणालाही सांगितले नाही. दरम्यान, यशश्री अचानक बेपत्ता झाली होती. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह उरण-पनवेल रेल्वे मार्गालगतच्या झुडपात सापडला होता. तिचे अवयव कापून ही हत्या करण्यात आली होती. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. यशश्रीवर अंत्यसंस्कारही करण्यात आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT