Yashashri Shinde Death Case Saam TV
मुंबई/पुणे

Uran Crime News: यशश्रीच्या मारेकऱ्याला आमच्या ताब्यात द्या, आम्ही शिक्षा देऊ; उरणकरांनी मोर्चा काढत केली मागणी

Yashashri Shinde Death Case: यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांनी तिला न्याय मिळावा यासाठी आज मोर्चा काढला होता. आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी या नागरिकांनी केली.

Priya More

नवी मुंबईच्या उरणमध्ये राहणाऱ्या यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करून तिचा मृतदेह झाडाझुडपामध्ये फेकून देण्यात आला होता. यशश्रीच्या हत्येनंतर संतप्त झालेल्या उरणकरांनी तिला न्याय मिळावा यासाठी आज मोर्चा काढला होता. आरोपीला आमच्या ताब्यामध्ये द्या आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी या नागरिकांनी केली. यशश्रीची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू आहे.

उरणमध्ये राहणाऱ्या तरुणीच्या हत्येनंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यशश्रीला न्याय मिळावा यासाठी उरणमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला होता. मोठ्या संख्यने उरणकर नागरिक मोर्चामध्ये सहभागी झाले होते. उरणमधील महात्मा गांधी पुतळ्याजवळून मोर्चाला सुरुवात झाली होती. आरोपीला अटक करुन फाशीची शिक्षा देण्याची मागणी स्थानिकांनी केली.

नवी मुंबईतील उरण येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे नावाच्या तरुणीची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यशश्रीचा मृतदेह कोटनाका पेट्रोल पंपाजवळ आढळून आला असून तिच्या शरीराची विटंबना केल्याचे समोर आले होते. यशश्रीच्या चेहरा, शरीर आणि गुप्तांगावर जखमा आढळून आल्या. यशश्रीची धारधार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. तिचे अवयव तोडून शरीरावर सर्वत्र वार करण्यात आले होते आणि तिचे केसही कापण्यात आले होते.

यशश्री गुरुवारी कामावर निघाल्यापासून बेपत्ता होती. त्यानंतर तिच्या वडिलांकडून पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. यशश्रीचा मृतदेह सापडल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. याप्रकारणी यशश्री शिंदेच्या वडिलांनी दाऊद शेख नावाच्या तरुणाने हत्या केल्याचा आरोप केलाय.

याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी सात पथके तयार केली होती. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता आणि त्याने आपला मोबाईल बंद केला होता. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपीला महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरून अटक केली असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT