Mumbai Crime: 'चुलबुल पांडे'च्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांकडून गर्लफ्रेंडला अटक

Worli Police: गुरूसिद्धप्पाच्या हत्याप्रकरणात त्याच्या मैत्रिणीचा देखील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता
Mumbai Crime: 'चुलबुल पांडे'च्या हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांकडून गर्लफ्रेंडला अटक
Worli News Saam Tv
Published On

वरळीतील स्पा पार्लरमध्ये कथित आरटीआय कार्यकर्ता आणि पोलिसांच्या खाबऱ्याची हत्या झाली होती. या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वरळी पोलिसांनी गुरूसिद्धप्पा वाघमारेच्या मैत्रिणीला अटक केली आहे. गुरूसिद्धप्पाच्या हत्याप्रकरणात त्याच्या मैत्रिणीचा देखील सहभाग असल्याचा पोलिसांना संशय होता. तपास करताना तिचा देखील गुरू वाघमारेच्या हत्येत सहभाग असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. पोलिसांकडून याप्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. याप्रकरणात ही चौथी अटक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरळी पोलिसांनी गुरूसिद्धप्पा वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफला अटक केली आहे. मेरी जोसेफ ही गुरु वाघमारेची गर्लफ्रेंड होती. हत्येच्या रात्री गुरू वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफ त्याच्यासोबत होती. मेरी आणि गुरू हे वरळीमधील स्पा पार्लरमध्ये रात्री १ वाजता आले होते. मेरीला गुरूच्या हत्येच्या कटाची माहिती असताना देखील तिने गुरूला स्पामध्ये बोलावल्याचा पोलिसांचा दावा आहे. मेरीने गुरू वाघमारेचे लोकेशन आरोपींसोबत शेअर केल्याचा देखील दावा पोलिसांनी केला आहे.

स्पा आणि मसाज पार्लरकडून खंडणी उकळण्याचा आरोप असलेल्या गुरू वाघमारेच्या जीवाला धोका होता. गुरू वाघमारेने आपल्याला जीवाला धोका आसल्याच्या भीतीने २२ संशयितांची नावे आपल्या दोन्ही पायांवर आणि पाठीवर गोंदवली होती. गुरू वाघमारेच्या हत्येनंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. आरोपींमध्ये स्पा मालकांचा समावेश आहे. गुरू वाघमारेची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफिने अटक केली होती. याप्रकरणी संतोष शेरेकर, फिरोझ अन्सारी आणि शाकीब अन्सारी या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. ४ लाख रुपयांची सुपारी देऊन गुरू वाघामारेची हत्या करण्यात आली होती.

दोन कथित हल्लेखोरांपैकी एकाने गुटखा खरेदी करण्यासाठी ७० रुपयांचे यूपीआय पेमेंट केले होते. यावरूनच पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावत ३ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर आता याप्रकरणात पोलिसांनी गुरू वाघमारेची मैत्रीण मेरी जोसेफला अटक केली. स्पा आणि मसाज पार्लरवर पोलिसांकडून छापा टाकण्याची आणि आरटीआय अर्ज दाखल करेल अशी धमकी गुरू वाघमारे स्पा मालकाना देत होता. यामुळेच स्पा मालकांनी त्याची हत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com