Shivaji Park Crocodile: शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आढळली मगर; पण ते पिल्लू आलं कुठून?

Shivaji Park: मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये एक मगर आढळली. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवण्यात आलंय.
Shivaji Park Crocodile: शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये आढळली मगर; पण ते पिल्लू आलं कुठून?
Published On

Shivaji Park Crocodile:

मुंबईच्या शिवाजी पार्कमधील महात्मा गांधी स्विमिंग पूलमध्ये एक मगर आढळली. एका कर्मचाऱ्याने मगरीला पाहिल्यानंतर तिला पकडून ड्रममध्ये ठेवण्यात आलंय. परंतु पूलमध्ये मगर दिसल्यामुळे कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती. हे मगरीचं पिल्लू कुठून आलं हा प्रश्न उपस्थित होत असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. या मगरीच्या पिल्लूने एका कर्मचाऱ्याला चावा घेतल्याच सांगण्यात येत आहे. पार्कच्या बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून मगर धरण तलावात आली असावी, अशी शक्यता स्विमिंग पूलच्या अधिकाऱ्यांनी वर्तवलीय.(Latest News)

याबाबत माहिती देताना उद्याने उपायुक्त किशोर गांधी यांनी सांगितलं की, भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक काळजी भविष्यात घेण्यात येईल. या घटनेबाबत अधिक माहिती देताना जलतरण तलाव आणि नाट्यगृहांचे समन्वयक संदीप वैशंपायन म्हणाले की, "रोज पहाटे तरण तलाव सदस्यांसाठी सुरू करण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांद्वारे तरण तलावाचे काळजीपूर्वक निरीक्षण करण्यात येते. यानुसार आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास तरण तलावाचे निरीक्षण करत असताना ऑलम्पिक आकाराच्या आणि शर्यतीसाठीच्या तरण-तलावात मगरीचे पिल्लू आढळून आले.

त्यानंतर तज्ज्ञांच्या मदतीने तात्काळ कार्यवाही करत हे पिल्लू सुरक्षितपणे पकडण्यात आलं. जलतरण तलावाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार बाजूलाच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून ही मगर तलावात आली असावी असा संशय आहे. दरम्यान याआधीही अजगर आणि सापासारखे अनेक प्राणी प्राणीसंग्रहालयातून बाहेर पडले होते. त्यामुळे या प्राणीसंग्रहालयावर कारवाई करावी, अशी मागणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केलीय. जलतरणाच्या बाजूला असलेले प्राणी संग्रहालय अनधिकृत आहे.

त्यातून हे प्राणी बाहेर येतात,आधी अजगर आलेला, साप आलेला, जर कोणाला हे प्राणी चावले तर कोणाची जबाबदारी? मुळात असे प्राणी पाळायला परवानगी कोणी दिली? कोणाचा राजकीय वरदहस्त या प्राणी संग्रहालयाला आहे? ती जागा पालिकेने कोर्टात जिंकली आहे, तरी कारवाई होत नाही. प्राणी संग्रहलायतील प्राण्यांना अतिशय दूरावस्थेत ठेवले जाते मग वनविभाग कारवाई का करत नाही? आज ते मुंबई आयुक्तांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडणार असल्याची माहितीही देशपांडे यांनी माध्यमांना दिलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com