Pune: पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण Saam Tv
मुंबई/पुणे

Pune: पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 12 फुटी पुतळ्याचे अनावरण

आज पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: आज पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये (Savitribai Phule Pune University Pune) साकारण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule Statue) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल (Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते अनावरण सोहळा संपन्न करण्यात आला आहे. अखिल भारतीय महात्मा फुले (Mahatma Phule) समता परिषदेत पाठपुराव्यामधून आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विशेष प्रयत्नामधून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आलेला आहे. (Unveiling 12 feet statue Krantijyoti Savitribai Phule Pune University)

हे देखील पहा-

या पुतळ्याचे अनावरण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने ३ जानेवारी २०२२ दिवशी करण्यात येणार होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव अधिक असल्यामुळे सदरचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. या भव्य १२ फूट पुतळा विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये मुख्य इमारतीच्या आवारात सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला आहे. कात्रज पुणे येथे परदेशी स्टुडिओमध्ये सावित्रीबाई फुले यांचा भव्य पुतळा बनवण्यत आला आहे. अतिशय भव्यदिव्या अश्या या पुतळ्याची उंची १२ फूट इतकी आहे. (Unveiling 12 feet statue Krantijyoti Savitribai Phule Pune University)

कार्यक्रमामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळजी, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरु डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पुतळा समितीचे अध्यक्ष डॉ. संजय चाकणे, समता परिषदेचे पदाधिकारी उपस्थित अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी इत्यादी उपस्थित होते.

सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ओळखले जाणाऱ्या विद्यापीठ त्यांचा पुतळा कोणत्या ठिकाणी बसवायचा यावरून समितीमध्ये मतभेद होते. मात्र विद्यापीठात मुख्य इमारतीच्या परिसरात हा पूर्णआकृती पुतळा बसवण्याचे निश्चित करण्यात आले होते. विद्यापीठात हा पुतळा नेमका कुठे बसवायचा याकरिता अनेक जागा सुचवण्यात आले आहेत. परंतु, सर्वानुमते मुख्य इमारतीच्या जवळपास हा पुतळा असावा असे ठरविण्यात आल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितली होती.

सावित्रीबाई फुले यांचा विद्यापीठात पुतळा बसवत असताना दुसरीकडे शहरात ज्या भिडेवाड्यात सावित्रबाईनी मुलींची पहिली शाळा घेतली होती. तिथे देखील शाळा उभारण्यात येणार आहे. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेच्या वतीने शाळा उभारण्यात येणार आहे. त्याकरिता आवश्यक जागेचे संपादन देखील केले जाणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

SCROLL FOR NEXT