Pune Rain Saam tv
मुंबई/पुणे

Pune Rain Update : ऐन उन्हाळ्यात पुण्याला पावसानं झोडपलं; उकाड्याने हैराण झालेल्यांना मिळाला दिलासा

Pune Rain Update news : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. मागील दोन दिवसांत पुण्याचे तापमान ४१ सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. या तापमानामुळे शहरात उष्माघाताचे रुग्ण वाढले होते.

Vishal Gangurde

सागर आव्हाड, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. मागील दोन दिवसांत पुण्याचे तापमान ४१ सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होतं. या तापमानामुळे शहरात उष्माघाताचे रुग्ण वाढले होते. या कडक उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकांना आज गुरुवारी निसर्गाने मोठा दिलासा आहे. ऐन उन्हाळ्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा दिला आहे.

पुणे शहरात आज गुरुवारी विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने वर्तवेलेल्या अंदाजानुसार आज गुरुवारी पाऊस कोसळला. त्यानंतर शहराचं ४१ डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचलेल्या तापमानापासून मोठा दिलासा मिळाला आहे. या अवकाळी पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुणे शहरात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी जमा झाले आहे. पुण्यातील नांदेड सिटी परिसरातील रोडवर पाणी जमा झालं. त्यानंतर गाड्या चालवताना मोठी कसरत पुणेकरांना करावी लागत आहे. तर पुण्यातील शिरुर,आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील अनेक भागाला जोरदार अवकाळी पावसाने झोडपलं.

आज दुपारी अचानक कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा आणि फळबागांना मोठा फटका बसणार आहे. तर ग्रामीण भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने काही दिलासा मिळणार आहे. सकाळपासूनच परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. त्यानंतर आज दुपारनंतर या भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे.

हिंगोलीत कळमनुरीत अवकाळी पाऊस, नागरिकांची तारांबळ उडाली

हिंगोलीच्या जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. आज गुरुवारी दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली होती, तर मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची देखील पावसामुळे पंचायत झाली. या पावसामुळे उकाड्याने हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा देखील मिळाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

काळा लसूण म्हणजे काय? जाणून घ्या त्याचे आरोग्यदायी फायदे|Black Garlic Benefits

Ayodhya Ram Mandir : राम मंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT