Rain
Rain  Saam TV
मुंबई/पुणे

Unseasonal Rain: मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाचं धुडगूस; शेतकरी मोर्चालाही पावसाचा फटका, शेतकऱ्यांची आडोशासाठी धावपळ

साम टिव्ही ब्युरो

Unseasonal Rain News : मुंबईसह उपनगरात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. आज सकाळपासूनच मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. संध्याकाळी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली.

विजांच्या कडकडाटासह अचानक सुरु झालेल्या पावसाने मात्र घरी निघालेल्या चाकरमान्यांची चांगली तारांबळ उडाली. काही ठिकाणी वीजपुरवठा देखील खंडित झाला आहे. अचानक सुरु झालेल्या पावसाचा फटका शेतकरी मोर्चाला देखील बसला.

शेतकरी मोर्चा आज वाशिंद येथे मुक्कामी आहे. मात्र वाशिंदमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांचा मुक्काम मोकळ्या मैदानावर असल्याने त्यांची मोठी धावपळ झाली. शेतकऱ्यांनी झाड, गाडी मिळेल तिथे आडोसा घेतला. पावसात भिजत असलेल्या शेतकऱ्यांसाठी राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरु केले आहे.

हजारो शेतकऱ्यांसाठी एकाच जागी व्यवस्था करण्याचं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. शेतकरी वेगवेगळ्या ठिकाणी राहण्यास तयार होणार का? हा प्रशासनासमोरची अडचण आहे. (Latest News)

ठाणे शहरात रात्रीच्या सुमारास अवकाळी रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर शहरात ढगाळ वातावरण असतानाच पावसाने हजेरी लावली. शहरातील पाचपाखाडी, घोडबंदर रोड, नौपाडा, वागळे इस्टेट या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

कल्याण, डोंबिवली भागात सायंकाळी आठ वाजण्याच्या अचानक सोसाट्याच्या वारा सुटला व अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक कोसलेलेल्या पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. तर दुसरीकडे कल्याणच्या काही भागात वीजपुरवठा खंडित झाला होता.

उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे अनेक भागांत वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला. शिवमंदिर आर्ट फेस्टिवल उद्घाटनच्या दिवशीचा नियोजित शो देखील रद्द करण्यात आला आहे. अचानक पाऊस आल्याने प्रेक्षकांची तारांबळ उडाली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबो, अधिकारी महिलेकडं घबाडच सापडलं! मुंबई एअरपोर्टवर 25 किलो सोनं जप्त | Mumbai Airport

AC Tips and Tricks : उन्हाळ्यात AC ऑन करण्याआधी 'या' गोष्टी करा; अन्यथा तुम्हालाही लाईट बिल जास्त येईल

Abhijit Bichukale EXCLUSIVE: कल्याण लोकसभा मतदारसंघच का? अभिजित बिचुकले यांचं उत्तर ऐकण्यासारखंय!

Anuj Thapar : अनुज थापरचा शवविच्छेदन अहवाल आला समोर, कुटुंबीयांनी केली सीबीआय चौकशीची मागणी, नेमकं कारण काय ?

Onion Export News Today: 550 रुपये प्रतिमॅट्रिक टन शुल्क! कांदा निर्यातीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT