बदलापूर, डोंबिवली, कल्याणमध्ये अवकाळी पावसाने (Badlapur Unseasonal Rain) हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारंबळ उडाली. या पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरूवात झाली आहे. त्याचसोबत रेल्वे प्रवाशांना देखील या पावसाचा फटका बसत आहे. सध्या बदलापूर आणि वांगणी परिसरात जोरदार वेगाने वारे वाहत आहेत.
कल्याण आणि डोंबिवली शहरात आज दुपारपासूनच ढगाळ वातावरण पाहायला मिळत होतं. दोन्ही शहरात सोसाट्याचा वारा सुटला होता. काही वेळापूर्वीच कल्याण, डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे घराकडे परतणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.
बदलापूर आणि वांगणीत जोरदार मुसळधार पाऊस पडत आहे. उल्हासनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार वारा सुटला आहे. या पावसामुळे नागरिकांचे हाल होत आहे. अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची तारंबळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरूवात झाली आहे.
तर दुसरीकडे मुंबई आणि उपनगरामध्ये देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. कुर्ला, सायन, विद्याविहार, मुलुंड, भांडूप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर, देवनार, चेंबूर, मानखुर्द या परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे ऑफिसवरून घराच्या दिशेने जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होताना दिसत आहेत. या पावसाचा फटका रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतुकीवर होताना दिसत आहे.
दरम्यान, पालघरमध्ये अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. जव्हारसह परिसरात गारपीट होत आहे. तर पूर्व भागात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. पूर्व भागातील भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सूर्या प्रकल्पाच्या पाण्यावर सुरू असलेल्या भात शेतीच अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या पावसामुळे उकड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. या पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीची सुरू असलेली सभा त्यांनी आटोपती घेतली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.