मुंबई: मुंबईतील मुलुंडमधून एक भयंकर बातमी समोर आली आहे. एका ३३ वर्षीय युवकावकर अनैसर्गिक अत्याचार (Unnatural Sexual Assault) करुन त्याच्या गुप्तांगावर चक्क मेणबत्तीचे चटके देण्यात आले आहेत. या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून पोलीसांनी याबाबतचा तपास सुरू केला आहे. (Mulund Crime News)
हे देखील पाहा -
मिळालेल्या माहितीनुसार, अनैसर्गिक अत्याचार करणारा ३४ वर्षीय आरोपी सुरेश म्हस्के या नराधमाविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात (Mulund Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सुरेश म्हस्के याने ३३ वर्षीय तक्रारदार असलेल्या तरुणाकडून काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत देण्यास आरोपी टाळाटाळ करत होता, त्यामुळ तक्रारदार तरुणाने त्याच्याकडे अनेकदा पैशांचा तगादा लावून धरला होता. असंच एक दिवस ६ जुलैला त्या तरुणाने आरोपीकडे पुन्हा पैशांची मागणी केली, त्यामुळे आरोपीला प्रचंड राग आला आणि हा राग अनावर झाला. आरोपीने दुपारी २ वाजता तरुणाला मुलुंड कॉलोनीत असलेल्या हिंदुस्तान चौकासमोरच्या गोडाऊनमध्ये गाठलं आणि त्याला मारहाण करत तरुणावर लैंगिक अत्याचार केले आहे.
यावेळी आरोपीने तरुणाच्या गुप्तांगात पाईप घातला. एवढ्यावरच न थांबता त्याने तरुणाच्या गुप्तांगाला मेणबत्तीचे चटकेही दिले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या अनैसर्गिक अत्याचारामुळे तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला सायनमधील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
या भयंकर घटनेमुळे आता पुरुषांवरही लैंगिक अत्याचार वाढत असल्याचं समोर आलं आहे. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी म्हस्केवर ३७७, ३२६, ५०४,५०६ भादवी कलमांतर्गत मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण असून खळबळ माजली आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र अशा घटनेमुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही का? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांमधून उपस्थित होतोय.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.