पालघर जिल्हाही अनलॉक करा; आ.क्षितीज ठाकूरांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी रश्मी पुराणिक
मुंबई/पुणे

पालघर जिल्हाही अनलॉक करा; आ.क्षितीज ठाकूरांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई ठाणे जिल्ह्यांप्रमाणे अनलॉक प्रक्रिया पालघर जिल्ह्यातही सुरू करावी, अशी विनंती बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर : कोरोना रुग्णांची दैनंदिन संख्या कमी होऊ लागल्यानंतर आता राज्यात अनेक ठिकाणी निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ही अनलॉक प्रक्रिया पालघर जिल्ह्यातही सुरू करावी, अशी विनंती बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितीज ठाकूर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. नालासोपाराचे आमदार क्षितीज ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांची भेट घेत लसींचा तुटवडा, वसईतील लोकांना लोकल प्रवासाची मुभा आदी मुद्द्यांवर चर्चा केली.Unlock Palghar district MLA Kshitij Thakur's demand to the Health Minister

सरकारने मुंबईMumbai आणि ठाणेThane जिल्ह्यातील दुकानं रात्री १० पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा दिली आहे. सरकारने कोरोनाच्या पॉझिटिव्हिटी रेटचाCorona Positivity rateविचार करून शहरांची विभागणी चार स्तरांमध्ये केली आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे आणि मीरा-भाईंदर ही शहरं दुसऱ्या स्तरात मोडतात. त्यामुळे येथे रात्री १० पर्यंत दुकानं उघडी राहू शकतात. पण शेजारीच असलेला पालघर जिल्हाPalghar District मात्र तिसऱ्या स्तरात येतो. पण येथील दुकानदारांनाही रात्री १० पर्यंत दुकानं उघडी ठेवण्याची सूट द्यावी, अशी मागणी आ. ठाकूर यांनी केली आहे.

वसई-विरार महापालिकेतMunicipal Corporationपॉझिटीव्हिटी रेट २.०७ टक्के एवढा कमी आहे. गेली दोन वर्षं या भागातील व्यापारी, दुकानदार यांची हातातोंडाची मिळवणी करताना नाकी नऊ आले आहेत. या सर्वांच्या कुटुंबियांची परिस्थितीही बिकट आहे, असं क्षितीज ठाकूर म्हणाले.

त्याचप्रमाणे आ. ठाकूर यांनी पालघर जिल्ह्यातील लसीकरणाच्या मंद गतीकडेही आरोग्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. पालघर जिल्ह्यासाठी दिल्या गेलेल्या लसींपैकी ५० टक्के लसी वसई-विरार महापालिका हद्दीत वापरण्याची अनुमती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

वसई तालुक्यातली लाखो लोक अजूनही लसीपासून वंचित आहेत. या भागात लोकवस्ती घनदाट आहे आणि त्या तुलनेत उपलब्ध लससाठा मर्यादित आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर Vaccination Center तासन् तास रांगेत उभं राहूनही लोकांना रिक्त हस्ते परत जावं लागत आहे, असं आमदार क्षितीज ठाकूर यांनी आरोग्यमंत्र्यांना दाखवून दिलं.

आतापर्यंत तब्बल १,०२,९९२ लोकांना लस मिळाली असून त्यापैकी ८४,२८७ जणांना पहिलाच डोस मिळाला आहे. १८,७०५ जण मात्र दोन्ही डोस घेऊन सुरक्षित आहेत. मात्र वसई विरार महापालिका क्षेत्रातील एकूण लोकसंख्या जवळपास २३ लाखांच्या आसपास आहे.बहुजन विकास आघाडीच्या या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्र्यांकडे आणखी एक मागणी केली. पालघर जिल्ह्यातील लोकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, या मागणीकडे त्यांनी लक्ष वेधलं. पालघर जिल्ह्यातील लाखो लोक दर दिवशी अनेक तास प्रवास करून शहराच्या दुसऱ्या टोकाला नोकरी धंद्यासाठी जातात. त्यासाठी पैसा आणि वेळ दोन्ही खर्च होत आहे. यापैकी बहुतांश लोक निम्न मध्यमवर्गातील असल्याने त्यांना मोठा फटका बसत असल्याचंही आमदार ठाकूर यांनी स्पष्ट केलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपेHealth Minister Rajesh Tope यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. या सर्व गोष्टींबाबत लवकरच तोडगा काढला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं. या शिष्टमंडळात माजी महापौर नारायणजी मानकर,प्रवीणजी शेट्टी,अजयभाई खोखानी आणि वसई तालुका हॉटेल असोसिएशन,वसई क्लॉथ जनरल व्यापारी असोसिएशन,वसई व्यापारी महासंघ, व इतर व्यापारी संघाचे प्रतिनिधि उपस्थित होते.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जयंत पाटील आघाडीवर

Lucky Zodiac Sign: आज या राशीचं नशीब चमकणार; शुभ बातमी कळणार

Maharashtra Election Result: फक्त लीड मोजा, १६० जागांवर महायुती येणारच; मुख्यमंत्री दिल्लीत ठरणार- चंद्रकात पाटील

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

SCROLL FOR NEXT