Pune Crime News  Saam tv
मुंबई/पुणे

Pune Crime News: 'खूप मस्ती आली का? चुपचाप २५ लाख दे...';भाजपच्या माजी नगरसेवकाला धमकी

पुण्यात भाजपच्या माजी नगरसेवकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

Prachee kulkarni

Pune News : पुण्यात काही दिवसांपूर्वी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच भाजपच्या माजी नगरसेवकाकडे खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. 'खूप मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे, असं म्हणत भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांना धमकी आली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

भाजपचे (BJP) नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले गणेश बिडकर यांना अज्ञात व्यक्तीकडून शिवीगाळ झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याचबरोबर पुण्याचे (Pune) भाजपचे नेते गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितली आहे. एका अनोळखी क्रमांकावरून धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे.

गणेश बिडकर यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनोळखी नंबर वरुन धमकी देत खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी गणेश बिडकर यांनी या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Crime News)

बिडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रामनवमी उत्सव सुरू असताना त्यांना एका अनोळखी व्यक्तीने व्हॉट्सॲप कॉल करून मराठी आणि हिंदी भाषेत शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्या व्यक्तीने 'खूप मस्ती आली का? चुपचाप पंचवीस लाख रुपये दे" अशी धमकी देत खंडणी देखील मागितली. पैसे नाही दिले तर तुझी बदनामी करू, असे देखील या अनोळखी व्यक्तीने बिडकर यांना सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

Maharashtra Live News Update: चिंचवडमध्ये मॉलजवळ मोठी आग

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! शिवीगाळ करत तरुणावर कोयत्याने हल्ला, मारहाणीचा थरारक व्हिडीओ व्हायरल

Besan Barfi Recipe: अचानक लागलेल्या भूकेसाठी झटपट घरी बनवा टेस्टी बेसन बर्फी

Guhagar Tourism : बालीची आठवण करणारा गुहागर समुद्रकिनारा! One Day ट्रिपसाठी बेस्ट प्लॅन इथे वाचा

SCROLL FOR NEXT