Beed Crime News
Beed Crime NewsSaam tv

Beed Crime News : बीडसांगवीत का घडतयं अघटित ? ग्रामस्थ चिंतेत

याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Published on

Beed News : गेल्या तीन दिवसांपूर्वी बीडच्या आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच बीडसांगवी गावाजवळच असलेल्या वेताळवाडी येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. यामुळे बीड जिल्ह्यात चितेंचे वातावरण पसरले आहे. (Maharashtra News)

Beed Crime News
Kolhapur Jotiba Chaitra Yatra : चैत्र यात्रेत जोतिबाला जाणार आहात ? वाचा नवे निर्बंध

प्रतिक्षा सुरेश वनवे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. प्रतिक्षा हिने आपल्या राहत्या घरातच आत्महत्या केली. या घटनेच्या वेळीस प्रतिक्षा हिच्या घरात कुणी नव्हते.

Beed Crime News
Nitin Gadkari's Panvel Speech: खरोखर मी थकलाेय आता, इजा...बिजा.. आता तिजा असं का म्हणाले नितीन गडकरी (पाहा व्हिडिओ)

या घटनेची माहिती समजताच आष्टी पोलीस (asthi police) घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान प्रतिक्षाने नेमकी आत्महत्या का केली ? हे अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com