Content On Demand Services In Mumbai Local Saam TV Digital
मुंबई/पुणे

Mumbai Local: मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रेल्वेचं अनोखं गिफ्ट; Content On Demand सुविधेचा शुभारंभ...

Free WiFi In Mumbai Local: यामुळे लोकल प्रवासादरम्यान आपल्या मोबाईलवर चित्रपट पाहणं, विविध शोज् पाहणं, शॉपिंग करणं हे शक्य होणार आहे, तेही विना इंटरनेट, आणि अगदी मोफत!

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता प्रवासात कंटाळा येणार नाही. त्याचं कारण म्हणजे रेल्वेने आता प्रवाशांच्या मनोरंजनाची (Entertainment) पुरेपूर काळजी घेतली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळातर्फे आजपासून मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) कंटेंट ऑन डिमांड (Content On Demand) ही सेवा सुरू करण्यात आली आहे. यामुळे लोकल प्रवासादरम्यान आपल्या मोबाईलवर चित्रपट पाहणं, विविध शोज् पाहणं, शॉपिंग करणं हे शक्य होणार आहे, तेही विना इंटरनेट, आणि अगदी मोफत!

हे देखील पहा -

होय हे खरं आहे... आपल्याकडे इंटरनेटचा रिचार्ज नसेल, मोबाईलला नेटवर्क नसेल तरीही आपण Content Conjunction करु शकतो. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय मंडळ आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स यांच्या संयुक्त विद्यमाने इन-ट्रान्झिट तंत्रज्ञानाद्वारे हे शक्य झालं आहे. प्रवासी आता आता त्यांच्या प्रवासात डिजिटल सेवांचा अखंड लाभ घेऊ शकतात. मुंबई विभागीय मंडळ (Central Railway Mumbai Division) आणि शुगरबॉक्स नेटवर्क्स (SugarBox Networks) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेली ही सेवा जगातील पहिली हायपरलोकल एज क्लाउड प्लॅटफॉर्म सेवा आहे.

प्रवाशांना ही सेवा वापरण्यासाठी त्यांच्या मोबाईलमध्ये शुगरबॉक्स हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर मोबाईलचा वायफाय (WiFi) चालू करुन नेटवर्कला कनेक्ट केल्यानंतर या ॲपमधील डिजिटल सेवांचा लाभ घेता येईल. या सुविधेचा शुभारंभ आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (CSTM) या रेल्वे स्थानकावर करण्यात आला. याप्रसंगी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी, शुगरबॉक्स नेटवर्कचे सह-संस्थापक रोहित परांजपे, रिपुंजय बररिया आणि देवांग गोराडिया तसेच मुंबई विभागाचे डीआरएम शालभ गोयल, आणि इतर सहकारी यावेळी उपस्थित होते.

या सुविधेचे फायदे काय?

१) लोकलमध्ये डिजिटल सेवा वापरता येणार (मुव्हीज्, शोज्, ऑनलाईन पेमेंट इत्यादी)

२) मोबाईलमध्ये रिचार्ज नसेल किंवा नेटवर्क नसेल तरीही डिजिटल सेवा वापरता येणार

३) प्रवासादरम्यान करमणूक

४) पुर्णपणे मोफत सेवा

ही सुविधा कशी वापराल?

१) सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअरवरुन शुगरबॉक्स हे ॲप डाऊनलोड आणि इंस्टॉल करावे.

२) ॲपला लोकेशनची परवानगी द्यावी.

३) आपला १० अंकी मोबाईल क्रमांक टाकावा, त्यानंतर ओटीपी आपल्याला एसएमएसद्वारे मिळेल, तो टाकून व्हेरिफिकेशन पुर्ण करावे.

४) आता आपले वायवाय चालू करुन शुगरबॉक्स या नेटवर्कला कनेक्ट करावे.

५) वायफाय शुगरबॉक्स नेटवर्कला कनेक्ट झाल्यानंतर या सेवेचा लाभ घेता येईल, मात्र केवळ शुगरबॉक्स ॲपमधील कंटेंट पाहता येईल बाकी पुर्ण इंटरनेट वापरता येणार नाही.

ही सुविधा कुठे-कुठे मिळेल?

सुरूवातीला मेन लाईन वरील 10 लोकलमध्ये ही सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. उर्वरित 155 लोकलमध्ये टप्प्या-टप्प्याने ती उपलब्ध करून दिली जाईल. ट्रेनमध्ये सर्व्हिस प्रोव्हायडरद्वारा वायफाय नेटवर्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा मेन लाईन वर सीएसटीएम-कल्याण/ कर्जत/ कसारा मार्गावरील लोकलवर ही सोय मिळेल.

"मध्य रेल्वे हा मुंबईतील सार्वजनिक वाहतुकीचा कणा आहे. आम्ही आमच्या उपनगरीय नेटवर्कवर दररोज ४५ लाख प्रवाशांचे साक्षीदार आहोत. (कोविड पुर्व काळात) बर्‍याचदा, प्रवाशांसाठी हा प्रवास वेळ त्यांच्या डिव्हाइसवर मनोरंजनाची संधी असते. भविष्यात पुढे राहण्याचे आमचे ध्येय मजबूत करू शकते. शुगरबॉक्ससोबतची आमची भागीदारी ही तंत्रज्ञानाचा वापर करून प्रवासी केंद्रीत वाढ करण्याच्या या प्रयत्नाच्या दिशेने एक पाऊल आहे. मला विश्वास आहे की हा संयुक्त प्रयत्न संपूर्ण डिजिटल इंडिया मिशनमध्ये योगदान देण्यासाठी खूप पुढे जाईल.
अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक - मध्य रेल्वे
"मुंबईकर प्रवासात त्यांच्या वेळेचा मोठा भाग घालवतात, हे लक्षात घेता, त्यांना ट्रांझिट दरम्यान अखंडित डिजिटल कनेक्टिव्हिटी मिळण्याची खात्री करणे आवश्यक आहे. या भागीदारीद्वारे आम्ही मुंबईला ट्रान्झिट कनेक्टिव्हिटीचे उत्कृष्ट उदाहरण बनवण्याचे आणि डिजिटली सुसज्ज ट्रॅव्हल लाइन बनवण्याचा आमचा उद्देश आहे. उपनगरीय मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी शून्य बफरिंग आणि हाय-स्पीड इंटरनेटसह डिजिटल अनुभव देण्याचा आमचा मानस आहे.
रोहित परांजपे, सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, शुगरबॉक्स नेटवर्क

शुगरबॉक्स नेटवर्क बद्दल

शुगरबॉक्स नेटवर्क्स हे जगातील पहिले हायपरलोकल एज क्लाउड प्लॅटफॉर्म आहे जे वापरकर्ते, नेटवर्क (ISPS, इंटरनेट इन्फ्रा प्रदाते, इ.) आणि डिजिटल सेवा (अ‍ॅप्स, वेबसाइट्स इ.) यांना लोकल एरिया नेटवर्क्सचा उपयोग करण्यासाठी सक्षम करते. या तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांसाठी इंटरनेट सुलभ, परवडणारे आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी, कंपनी कनेक्टिव्हिटीची पुनर्कल्पना करत आहे. 2016 मध्ये रोहित परांजपे, रिपुंजय बरारिया आणि देवांग गोराडिया यांनी एकत्र येत शुगरबॉक्स नेटवर्कची स्थापना केली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

Mumbai Police News : आलिशान कारमधून आले अन् टपरी चालकाला उचलून नेलं, मुंबईतील २ पोलिसांना बेड्या

Maharashtra Politics: मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का, मराठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश|VIDEO

SCROLL FOR NEXT