Ramdas Athawale Saam tv
मुंबई/पुणे

Ramdas Athawale News :...तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही; रामदास आठवले स्पष्टच बोलले

Ramdas Athawale News in Marathi : महायुतीने आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला एकही जागा दिली नाही, तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, मुंबई

Ramdas Athawale News in Marathi :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जागावाटपासाठी बैठकांचा धडाका लावला आहे. राज्यातील लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून हेवेदावे देखील सुरु झाले आहेत. यादरम्यानच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. तसेच महायुतीने आमच्या आरपीआय पक्षाला एकही जागा दिली नाही, तर आम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केले आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आठवलेंनी देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. रामदास आठवले म्हणाले, 'भाजप आणि 'एनडीए'ने अब की बार ४०० पार ही घोषणा दिली आहे. त्यामध्ये आमच्या रिपाईचे सुद्धा मोठे योगदान आहे. माझी अशी इच्छा आहे की, महायुतीने मला शिर्डी लोकसभा निवडणूक लढवू द्यावी. मी स्वत: शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार झालो आहे. तिसऱ्यांदा मला हार पत्कारावी लागली. पण मला परत आता शिर्डी लोकसभा निवडणूक लढवायची आहे'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'भाजप आणि मित्रपक्षांची काही महायुती झाली, ती काही फक्त अजित पवार गट सहभागी झाला म्हणून नव्हे तर आम्ही सुद्धा भाजपमध्ये आहोत म्हणून झाली. भाजपच्या मित्र पक्षालाही आंबेडकरवादी मते आधी मिळत नव्हती, पण आम्ही जेव्हा भाजपाच्या सोबत युती केली, तेव्हा 2012 पासून अनुसूचित जातींची मते भाजपाला मिळू लागली, असे आठवले म्हणाले.

'अशोक चव्हाण आता भाजपसोबत आले आहे. तिथे कमलनाथ आणि त्यांचा मुलगा सुद्धा भाजपमध्ये येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याविषयी बोलताना आठवले म्हणाले, 'कांग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभा दिली हे खूप योग्य केलं आहे. चंद्रकांत हंडोरे हे आमच्या पक्षात होते. आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्याला राज्यसभेवर जाण्याची संधी दिली हे योग्य केलं आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी समाजासाठी त्यांच्या कामकाजातून योगदान दिले आहे'.

'काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आणि मल्लिकार्जुन खरगे यांना पक्षाध्यक्ष बनवलं. या सर्व बाबी ठिक आहे, पण जेव्हा कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून मालिक्कर्जून खरगे यांचा विचार देखील केला नव्हता, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Paneer And Tofu: पनीर आणि टोफूमध्ये काय फरक आहे?

Vastu Tips: कोणाकडूनही 'या' वस्तू फुकट घेऊ नका, संकटात याल

Sillod Assembly Election: भाजप आणि उद्धवसेनेचे सूर जुळले; ठाकरेंनीच दिली हाक

Jayant Patil : देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपचा निर्धार; जयंत पाटील यांचा मोठा दावा

Chanakya Niti: या 3 सवयी असणाऱ्या व्यक्तीपासून कायम दूर राहा, आयुष्यात होईल पश्चात्ताप

SCROLL FOR NEXT