Narayan Rane And uddhav Thackeray Saam tv
मुंबई/पुणे

Narayan Rane : संजय राऊतांना विचारा जेलमध्ये कशी हवा असते ? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Narayan Rane News : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. 'माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक कामांना स्थगिती दिली आणि मग एकेक आमदारांना बोलावत होते. त्यांच्याकडून काय खोके घेतले आहेत. ईडीकडे त्याचा सर्व तपशील आहे. संजय राऊत यांना विचारा जेलमध्ये हवा कशी असते ? बाहेर आल्यावर कशी हवा बदलते, असं म्हणत नारायण राणे यांनी ईडी चौकशीचा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांचा खरपूस समाचार घेतला. यावेळी राणे यांनी दोन्ही नेत्यांवर टीकास्त्र सोडलं.

नारायण राणे म्हणाले, 'राज्यात सत्ता विरोधी पक्षाच्या नेत्यांना सत्ता गेल्याने निराशा आली आहे. त्यामुळे जनतेत भ्रम निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. देशाचे आणि राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर धक्कादायक वक्तव्य केले आहे. त्यांचे वाक्य काही काळ टीव्हीवर चालले, मग गायब झाले. शरद पवार हे चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आता नसून असल्या सारखे होते'.

'शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी याबाबत काही बोलले नाही. आता संजय राऊत कमी झाले आणि शरद पवार जास्त बोलू लागले आहेत. राज्यातील एक इंच जागा कर्नाटक काय इतर राज्याला देणार नाही असे आमचे मत आहे. बाळासाहेब असताना बेळगाव सीमाभागात आंदोलन झालं, तेव्हा उद्धव ठाकरे नव्हते. आंदोलन आणि उद्धव ठाकरे यांचा सबंध नाही. दंगल झाली, तेव्हा देखील उद्धव ठाकरे गेले नाहीत. त्यांचा काही संबंध नाही', असे नारायण राणे म्हणाले.

नारायण राणे (Narayan Rane) पुढे म्हणाले, 'विनायक सावरकर यांच्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार मांडले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आम्ही दैवत मांडतो. बाळासाहेब ठाकरे यांना जो आदर होता, तो उद्धव ठाकरे यांना आहे का ? सावरकराबद्दल टीका करणाऱ्या राहुल गांधी यांना आदित्य ठाकरे हे मिठी मारायला गेला होते. हिंदुत्व सोडलेल्या उद्धव ठाकरेंनी हिंदू हा शब्द उच्चारु नये किंवा जिभेवर नाव घेऊ नये, अशी टीका राणे यांनी केली.

'उद्धव ठाकरे यांना प्रशासन जमत नाही. उद्धव ठाकरे हे आंदोलन करू शकत नाही. उद्धव ठाकरे हे कुणाला मदत करू शकत नाही. शिवसेना कशी राहील ? उद्धव ठाकरेंची काय भाषा आहे ? राज्यात ७५ टक्क्यांपेक्षा जास्त साक्षरता आहे. मातोश्रीवर कदाचित नसेल, असेही राणे म्हणाले.

'कोराना काळात किती औषध चोरीला गेले. तुम्हाला वाक्य आठवत नसेल तर लिहून घेऊन तर बसत जावा... एवढे दिवस तुम्ही रेड्यांना मातोश्रीवर भेटत होते ना ? तुम्ही एवढ्या दिवस रेड्यांचा कर्णधार होते का ? उद्धव ठाकरे तुम्ही हिंमतीची भाषा करू नका. तुमच्या शिवसेनेची ताकद राहिली नाही. तुम्हाला हिंमत काय दाखवावे लागेल. आम्ही शिवसेना वाढविली. त्याचं श्रेय तुम्ही खाल्लं, अशी टीका राणे यांनी ठाकरे यांच्यावर केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ठाकरेंचा मराठवाड्यातील दुसरा दौरा, उद्धव ठाकरेंनी साधलं 'टायमिंग'?

'Bigg Boss 19'च्या घरात प्रणित मोरेचं कमबॅक? मिळाली मोठी हिंट

Maharashtra Live News Update: - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

SCROLL FOR NEXT