Amit Shaha In Sahakr Parishad Pune Saamtv
मुंबई/पुणे

Sahakar Parishad: 'सहकार क्षेत्र ही महाराष्ट्राची ताकद...' केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

'सकाळ'च्या वतीने बँकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Amit Shaha In Pune: "सहकार क्षेत्रात काही राज्ये चांगली काम करत आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र एक आहे. ग्रामीण अर्थकारणाला सहकार चालना देते मोठे करते, असे म्हणत महाराष्ट्रातील सहकार चळवळ प्रचंड मोठी आहे," असे प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

'सकाळ'च्या वतीने बँकिंग व साखर उद्योगासाठी सहकार महापरिषदेचं आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमात ते बोलत होते. या परिषदेसाठी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे.

काय म्हणाले अमित शहा..

"सहकार क्षेत्रात काही राज्ये चांगली काम करत आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र एक आहे. शाहू महाराजांनी कास्तकरांसाठी एक संस्था सुरू केली. सहकार हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे. विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठ मेहता आणि अमुलचे संस्थापक यांचा त्यात समावेश आहे."

"महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात पुर्वीपासून काम सुरू आहे. मी सुद्धा ३० वर्षांपेक्षा जास्त काळ सहकार क्षेत्रात काम केलं आहे," अशी प्रतिक्रिया अमित शहा यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे केले कौतुक..

तसेच पुढे बोलताना त्यांनी "भारतातल्या सहकार क्षेत्रात 31 टक्के योगदान साखर उद्योगाचं असून 16 % दूध, गहू 13% आणि तांदूळ - 20% टक्के वाटा उचलत असल्याचे," सांगितले आहे. यावेळी ग्रामीण अर्थकारणाला सहकार चालना देते मोठे करते, असे म्हणत महाराष्ट्रातील सहकार चळवळ प्रचंड मोठी आहे," अशा शब्दात त्यांनी कौतुक केले.

दरम्यान, "या परिषदेत मांडल्या गेलेल्या अनेक मुद्द्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे म्हणत सेंद्रिय शेती वाढत आहे. परंतु सेंद्रिय मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. त्यासाठी एक समिती गठित करुन एकच ब्रँड डेव्हलप करुन जगभरात माल विकण्यात येईल," अशी घोषणा शाह यांनी यावेळी केली.अशी आश्वासनही अमित शहा (Amit Shaha) यांनी दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT