Union Cabinet Meeting  
मुंबई/पुणे

Thane-Pune Metro: केंद्र सरकारचं महाराष्ट्राला मोठं गिफ्ट; पुणे-ठाण्यातील नव्या मेट्रो प्रोजेक्टला मंजुरी

Bharat Jadhav

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

केंद्र सरकारने ठाणे आणि पुणेकरांचा प्रवास गतीमान केलाय. आज झालेल्या केंद्रिय मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्त्वाच्या मेट्रो प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलीय. यावेळी महाराष्ट्राच्या अनुषंगाने 2 महत्वाचे मेट्रो प्रोजेक्ट मंजूर करण्यात आल्या आहेत. ठाणे येथील इंटीग्रल रिंग मेट्रो प्रकल्प आणि पुणे मेट्रो एक्स्टेंशन प्रकल्पाला आज केंद्राने मंजुरी दिलीय.

ठाण्यातील 12 हजार 200 कोटी रुपयांच्या इंटीग्रल रिंग मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलीय. ठाण्यातील वाढती लोकसंख्या वाढत आहे, ही गोष्ट लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय. तर पुण्यातील मेट्रो एक्स्टेंशन प्रकल्पाला देखील आज मंजुरी देण्यात आल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिलीय.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततचा पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली आहे. लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे. इंटग्रील मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पुण्याला गिफ्ट

पुणे टॉप 5 शहरात मानलं जातं. येथील मेट्रो एक्स्टेंशनच्या 2 हजार 954 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या मेट्रोने पुण्यात 6 लाख मेट्रो प्रवासी यात्रा करू शकतील. स्वारगेट ते कात्रजपर्यंत ही मेट्रो धावणार असून ही मेट्रो 5.4 किलोमीटरची याची लांबी असून 3 नवे स्टेशन या मार्गात असणार आहेत. पीसीएमसी ते स्वारगेट मेट्रोचा विस्तार होणार आहे. साडेपाच किलोमीटरच्या मार्गाला केंद्राकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला असून

ही मेट्रो स्वारगेट ते कात्रज नवा मेट्रो मार्ग पूर्णपणे अंडरग्राउंड असणार आहे. मेट्रो मार्गाला एकूण 2 हजार 954 कोटी रुपये खर्च येणार असून पीसीएमसी ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे.फेब्रुवारी २०२९ पर्यंत मेट्रोमार्ग पूर्ण करण्यात येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT