Ulhasnagar  Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar : उल्हासनगर शहरातील लाखो नागरिकांना दिलासा; अनधिकृत विकासकामांबाबत मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Unauthorized Development : शासकीय हद्दीत येणाऱ्या जागांवर गरिब आणि गरजू नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत. ही घरे तोडून येथील रविहाशांना बेघर करण्यापेक्षा त्यातून सुवर्णमध्य काढण्यात आला आहे.

साम टिव्ही ब्युरो

अजय दुधाणे

Ulhasnagar News :

उल्हासनगर (Ulhasnagar) शहरात विविध ठिकाणी शासकीय जागांवर अनधिकृतपणे इमारतींचे बांधकाम करण्यात आले आहे. शहरात एकूण २७ हजाराहून अधिक अनधिकृत विकासकामे आणि बांधकामे आहेत. ही बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय. बुधवारी झालेल्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

शासकीय हद्दीत येणाऱ्या जागांवर गरिब आणि गरजू नागरिकांनी आपली घरे बांधली आहेत. ही घरे तोडून येथील रविहाशांना बेघर करण्यापेक्षा त्यातून सुवर्णमध्य काढण्यात आला आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरीकांना अधिकृतपणे या ठिकाणी राहण्यासाठी काही शुल्क भरावा लागणारे. यासाठी केवळ १० टक्के भोगवटा शुल्क भरून आपले बांधकाम नियमित करून घेता येणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार आयलानी यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने प्रयत्नांना आता यश आले आहे. यामुळे उल्हासनगरच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

उल्हासनगर शहरातील शासकीय जमिनीवर गेले अनेक वर्ष या इमारती आणि घरे उभी आहेत. बुधवारी अनधिकृत बांधकामांना अधिकृत करण्याचा निर्णय मंत्री मंडळ बैठकीत घेतला गेला. अनधिकृत इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना यासाठी शासनाकडे फक्त 10 टक्के भोगवटा शुल्क भरावा लागणारे.

मंत्री मंडळ बैठकीत काल घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे लाखो उल्हासनगर वासियांना दिलासा मिळाला आहे, असे आमदार कुमार आयलानी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: राज्यात पावसाचा हाहाकार, हिंगोलीत २ जणांचा मृत्यू

Maharashtra Rain Alert: पुढचे २४ तास महत्त्वाचे! मुंबई, ठाणे, रायगडला रेड अलर्ट; गरज असेल तरच बाहेर पडा

School Holiday Today: पावसाची जोरदार बॅटिंग; मुंबई, ठाण्यासह 'या' ठिकाणी शाळांना सुट्टी; वाचा सविस्तर

Horoscope: घरात येईल सुख-समृद्धि; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरेल लाभकारी, जाणून घ्या राशीभविष्य

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

SCROLL FOR NEXT