Ulhasnagar Saam
मुंबई/पुणे

Crime: सिगारेटमुळे पेटला वाद! पान टपरीवाल्याने ग्राहकावर कैचीने वार केले, कपडे फाडले आणि..VIDEO

Pan Shop Owner Attacks Customer with Scissors: उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात एका पानटपरीवर सिगरेट घेण्यासाठी गेलेल्या युवकावर टपरी चालकाने जीवघेणा हल्ला केला.

Bhagyashree Kamble

उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका पान टपरी चालकाने ग्राहकाला बेदम मारहाण केली आहे. कैचीने ग्राहकावर सपासप वार केले. इतर ग्राहकांनी पान टपरी चालकाला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने ग्राहकाच्या अंगावर उडी घेत त्याचे कपडेही फाडले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.

उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात असलेल्या बीके पान शॉपमध्ये एक मारमारीची घटना घडली. या दुकानात एक तरुण सिगरेट घेण्यासाठी आला होता. मात्र टपरी चालकाने त्याला चुकीची सिगरेट दिली. एका सिगारेटमुळे पान टपरी चालक आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. बाचाबाचीनंतर पान टपरी चालकाने ग्राहकाला पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली.

नंतर टपरी चालकाने ड्रॉव्हरमधून कैची काढून कैचीनेही या तरुणावर जीवघेणा हल्ला चढवला. यावेळी उपस्थित इतर ग्राहकांनी टपरी चालकाला अडवलं. यानंतर टपरी चालकाने थेट ग्राहकाच्या अंगावर उडी मारत त्याचे कपडे फाडले. तसेच बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या घटनेनंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळवण्यात आली. मात्र, पान टपरी चालकाने जीवे मारण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांनी फक्त एनसी दाखल केली. एनसी दाखल केल्यामुळे पोलीस टपरी चालकाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. उल्हासनगरमध्ये रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत या टपऱ्या कशा सुरू असतात? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT