Building Lift Collapsed Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar News: उल्हासनगरात पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, नातू वाचला पण आजोबासोबत घडलं भयंकर

Building Lift Collapsed: उल्हासनगरमध्ये पाचव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळल्याची घटना घडली. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. तर चिमुकल्याचे प्राण वाचले.

Priya More

अजय दुधाणे, उल्हासनगर

उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) धक्कादायक घटना घडली आहे. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लिफ्ट अचानक कोसळली. या लिफ्टमध्ये एक वृद्ध आणि त्यांचा अडीच वर्षांचा नातू होता. या घटनेमध्ये आजोबांनी आपल्या नातवाला वाचवले पण ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरच्या कॅम्प नंबर -४ मध्ये ही घटना घडली आहे. याठकाणी असणाऱ्या सत्यजीवन इमारतीमध्ये पिंजारी कुटुंबीय राहतात. सरदार पिंजारी हे या इमारतीमध्ये राहणाऱ्या आपल्या भावाला भेटण्यासाठी आले होते. भावाची भेट झाल्यानंतर सरदार पिंजारी हे अडीच वर्षांच्या नातवाला घेऊन लिफ्टमधून खाली येत होते. त्याचवेळी अचानक लिफ्ट पाचव्या मजल्यावरून खाली जोरात कोसळली.

लिफ्टमध्ये बिघाड झाल्यामुळे ती खालच्या मजल्यावर आदळली माहिती समोर आली आहे. यावेळी लिफ्टमधील काही भाग हा सरदार पिंजारी यांच्या अंगावर उडाला. ज्यात पिंजारी यांच्या हाताचे आणि पायाचे हाड फ्रॅक्चर झालं आहे. पिंजारी यांच्यासोबत त्यांचा अडीच वर्षांचा नातू देखील होता. पिंजारी यांनी त्याला आपल्या छातीकडे जोरात पकडून ठेवल्यामुळे त्याला काही झाले नाही. आजोबांनी आपला जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवले.

लिफ्ट कोसळल्यानंतर इमारतीमध्ये मोठा आवाज झाला त्यामुळे सगळे घाबरले. या इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. याची माहिती तात्काळ टेक्निशियनला देण्यात आली. त्यानंतर लिफ्टमधून सरदार पिंजारी आणि त्यांच्या नातवाला बाहेर काढण्यात आले. जखमी झालेल्या सरदार पिंजारी यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या हात आणि पाय फॅक्टर झाले आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UK Politics: मुस्लीम महिला होणार ब्रिटनची PM; कोणाचं नाव आहे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?

एक मत गेमचेंजर ठरलं; ठाकरेंच्या शिलेदाराचं नशीब उजळलं, भाजपचं गणित बिघडलं

EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

Tuesday Horoscope : संपत्तीमध्ये वाढ होईल, दिवसभर आनंदी राहाल; ५ राशींच्या लोकांसाठी मंगळवार गेमचेंजर ठरणार

कारमध्ये डिझेल भरताना अनर्थ घडला; तरण्याताठ्या मुलाचा Heart Attackनं मृत्यू

SCROLL FOR NEXT