उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील स्टेट बँकेच्या मागे एका इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीत सुरक्षारक पाणी सोडण्यासाठी इमारतीत गेले असता विजेच्या वायरला हात लागल्याने त्यांना विजेचा जबर धक्का (Electric Shock) बसला असून या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अर्जुन सिंग सरोज असं मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे. आज सकाळी ते इमारतीमध्ये पाणी सोडण्यासाठी गेले असता शॉक (Shock) लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी स्थानिक नागरिकांनी त्यांना इमारत पडल्याचे पाहून मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना फोन करून घटनेची माहिती दिली.
पाहा व्हिडीओ -
दरम्यान, मृताचे नातेवाईक तत्काळ घटनास्थळी आले, यावेळी त्यांनी पाहिलं की अर्जुनसिंग यांच्या हातात विद्युत वायर आहे, नंतर या वायरला तपासले असता सदर वायरमध्ये विद्युत प्रवाह (Electric Current) सुरू असल्याचे दिसून आले.
त्यानंतर नातेवाइकांनी अर्जुन सिंग यांचा मृतदेह मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवला , याबाबत उल्हासनगरच्या विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, या मृत्यूस इमारतीचा बिल्डर कारणीभूत असून त्यांच्या निष्काळजीपणामुळे अर्जुनसिंग चा मृत्यू झाला असल्याचं नातेवाईकांनचं म्हणणं आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.