उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प चौकात भरदिवसा तरुणाची हत्या
आरोपी घटनास्थळावरून फरार
संपूर्ण घटना मोबाईलमध्ये कैद
पोलीस तपास सुरु
अजय दुधाणे, उल्हासनगर
उल्हासनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरात भरदिवसा एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना कुर्ला कॅम्प चौक परिसरात घडली असून संपूर्ण प्रकार तेथील एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव सतनाम सिंग लवाना असे आहे. हल्लेखोराने भररस्त्यात सतनाम सिंग याच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. या हल्ल्यात सतनाम जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने ही घटना कॅमेऱ्यात चित्रित केली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस आणि विठ्ठलवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करून पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली. संबंधित तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपी आणि मृतक यांच्यात यापूर्वी काही कारणावरून वाद झाल्याची माहिती समोर येत असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनेची पुष्टी करत आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आल्याचे सांगितले. तसेच लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, भरदिवसा घडलेल्या या हत्येच्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.