Auto Driver Beaten for Criticizing ShivSena Leader AI Photo
मुंबई/पुणे

ऐन निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी, रिक्षा चालकाला मारहाण अन् दमदाटी

Auto Driver Beaten for Criticizing ShivSena Leader: उल्हासनगरचे शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी एका रिक्षा चालकाला मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला.

Bhagyashree Kamble

  • शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी

  • रिक्षा चालकाला केली मारहाण

  • मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नगरपरिषद तसेच नगरपंचायतीच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुका पार पडतील. दरम्यान, महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी बड्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मात्र, उल्हासनगरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी पाहायला मिळाला. त्यांनी मिळून रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगरचे शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहराचे शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्याबद्दल बोलल्याच्या रागातून कार्यकर्त्यांनी या रिक्षाचालकाला दमदाटी करत मारहाण केल्याचा आरोप आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आधी रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. नंतर रिक्षाचालकाचा व्हिडिओ देखील तयार केला. त्याला जबरदस्तीने माफी मागण्यास देखील भाग पाडलं. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर स्थानिक ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

रिक्षा चालकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, उल्हासनगरमध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची दादागिरी वाढत असल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात कोयता गँगचा हैदोस! २५ ते ३० वाहनांची तोडफोड, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: राहाता तालुक्यातील साकुरी गावात बिबट्याचा मुक्त संचार, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Kolhapur Baba : चुटक्या वाजवत भूत उतरवणाऱ्या भोंदू बाबाला अटक, कोल्हापूर पोलिसांची कारवाई

''३० व्या मजल्यावरच्या खिडकीत उतरुन..'', अनंत गर्जेने पत्नीच्या टोकाच्या पावलावर दिली प्रतिक्रिया, प्रकरणात नवा ट्वीस्ट?

Kalyan : कल्याणमधील धक्कादायक प्रकार! महाविद्यालयातच नमाज पठण

SCROLL FOR NEXT