Ulhasnagar Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News: धक्का लागल्यामुळे टोळक्याकडून जबर मारहाण, उपचारादरम्यान व्यक्तीचा मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद

Man Dies After Beaten By Gang: या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलिसांकडून (Vitthalwadi Police) सुरु आहे.

Priya More

अजय दुधाणे, उल्हासनगर

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या (Ulhasnagar Crime) घटना वाढत चालल्या आहेत. हत्या, मारहाण, लुटमारीच्या घटना वारंवार समोर येत आहेत. अशामध्ये उल्हासनगरमध्ये धक्का लागल्यामुळे व्यक्तीला टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या मारहाणीत व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर ४ परिसरात (Ulhasnagar Camp 4 Area) ही घटना घडली आहे. या प्रकरणाचा तपास विठ्ठलवाडी पोलिसांकडून (Vitthalwadi Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर ४ परिसरात राहणारे राजेश कुकरेजा हे रविवारी रात्रीच्या सुमारास आपल्या घरी जात होते. त्याचवेळी सतरामदास हॉस्पिटलजवळ राजेश यांचा काही तरुणांना धक्का लागला. याच रागातून या टोळक्याने राजेश यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये राजेश कुकरेजा हे गंभीर जखमी झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

गंभीर जखमी झालेल्या राजेश यांना उपचारासाठी उल्हासनगरच्या एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना मुंबईच्या केईम रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान राजेश यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजेश यांच्या मुलाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याने याप्रकरणी मारहाण केलेल्या तरुणांविरोधात तक्रार दाखल केली.

राजेश यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीवरुन विठ्ठलवाडी पोलिसांनी बाळा उर्फ समीर गायकवाड, गौरव गोडिया, मनीष दुसेजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. पोलीस या फरार आरोपींचा शोध घेत आहे. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, उल्हासनगरमध्ये मागच्या महिन्यातच तरुणाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. किरकोळ वादातून उल्हासनगर स्टेशन परिसरात या तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT