Brij Bhushan Singh Bail : ब्रिजभूषण शरण सिंह यांना लैंगिक शोषण प्रकरणात अंतरिम जामीन; पुढील सुनावणी कधी?

Brij Bhushan Singh Bail gets Interim Bail : महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टानं मंगळवारी अंतरिम जामीन दिला.
Brij Bhushan Singh Bail
Brij Bhushan Singh BailSAAM TV
Published On

Brij Bhushan Singh Bail gets Interim Bail : महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू कोर्टानं मंगळवारी अंतरिम जामीन दिला. २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना २ दिवसांसाठी जामीन देण्यात आला आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्याव्यतिरिक्त विनोद तोमर यांनाही जामीन मिळाला आहे. आता २० जुलै रोजी कोर्टाकडून नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यावर निर्णय येईपर्यंत ब्रिजभूषण हे जामिनावर असतील.

Brij Bhushan Singh Bail
Opposition Meeting in Bengaluru : सत्ता किंवा पंतप्रधानपदामध्ये काडीमात्र रस नाही; काँग्रेसची स्पष्ट भूमिका

ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याव्यतिरिक्त त्यांचे नीकटवर्तीय आणि कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांनाही जामीन देण्यात आला आहे. तोमर देखील या प्रकरणात सहआरोपी होते. ब्रिजभूषण एकटे असताना तोमर हे त्यांची भेट घालून द्यायचे असा महिला पैलवानांचा आरोप आहे.

सहा महिला पैलवानांकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर दिल्ली पोलिसांनी कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासह सहायक सचिव विनोद तोमर यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. विनोद तोमर हे ब्रिजभूषण यांची मदत करायचे असा आरोप त्यात आहे.

Brij Bhushan Singh Bail
Kirit Somaiya Case: किरीट सोमय्या कथित व्हिडिओ प्रकरणावरून विधानपरिषदेत गदारोळ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) आरोपपत्रात नमूद केल्यानुसार, तक्रारदार महिला पैलवान तीन वेगवेगळ्या वेळी ब्रिजभूषण शरण सिंह यांची भेट घेण्यासाठी दिल्ली येथील त्यांच्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी त्या एकट्याच होत्या. एका घटनेत महिला पैलवानाचा पती आणि दुसऱ्या एका घटनेत पैलवानच्या प्रशिक्षकांना बाहेरच थांबण्यास सांगितले होते, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी दिल्लीच्या जंतरमंतरवर ३८ दिवस धरणे धरले होते.

पोलिसांनी मागील २८ मे रोजी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पैलवानांना तेथून हटवले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांची पैलवानांनी भेट घेतली होती. या प्रकरणात १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन ठाकूर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले होते. त्यानंतर पैलवानांनी धरणे आंदोलन मागे घेतले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com