Ulhasnagar News Saam Tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar News : संतापजनक! दारूच्या नशेत धक्का लागल्यानं थेट हत्या; घटनेनं फॉलोवर लेन परिसरात खळबळ

Ulhasnagar Crime News : पोलिसांकडून आरोपीला अवघ्या तासाभरात ठोकल्या बेड्या

अजय दुधाणे

Ulhasnagar Latest Crime News: राज्यात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता राज्यातील उल्हासनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  (Latest Marathi News)

दारूच्या नशेत एका व्यक्तीचा धक्का लागल्यानंतर वाद होऊन या इसमाची थेट हत्या करण्यात आल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करत अवघ्या तासाभरातच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प ३ मधील फॉलोवर लेन परिसरात गुरुवारी मध्यरात्री निरंजन यादव आणि अजय चव्हाण हे दोघे चालत जात होते. यावेळी त्यांना एकमेकांचा धक्का लागला. यावरून त्यांच्यात वाद होऊन अजय चव्हाण याने निरंजन याला लाकडी दांडक्याने मारहाण केली.

या मारहाणीत निरंजन हा जागीच कोसळला, तर अजय पळून गेला. याबाबत मध्यवर्ती पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेत निरंजनचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला. (Ulhasnagar Crime News)

या प्रकरणात अजय चव्हाणचं नाव निष्पन्न होताच अवघ्या तासाभरात पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. अजय चव्हाण याच्यावर यापूर्वी देखील दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

Maharashtra Live News Update : विठू नामाच्या जयघोषात धाकटी पंढरी दुमदुमली

Laxman Hake News : अजित पवारांची माफी मागावी अन्यथा...; लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस, अडचणी वाढणार

Shraddha kapoor: श्रद्धा कपूरचा ऑफ-शोल्डर ग्लॅमरस लूक पाहिलात का?

Bread Recipe: मुलांसाठी झटपट घरीच ब्रेडपासून बनवा 'हे' पदार्थ, रेसिपी वाचाच

SCROLL FOR NEXT