हॉटेलमध्ये जेवणानंतर बडीशेप का दिली जाते?

Surabhi Jayashree Jagdish

बडीशेप

जेवणानंतर हॉटेलमध्ये बडीशेप दिली जाते कारण ती फक्त स्वादासाठी नाही तर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि आरोग्याच्या अनेक फायदेशीर परिणामांसाठी उपयुक्त मानली जाते. बडीशेपमध्ये नैसर्गिक तेल आणि गुणधर्म आहेत.

fennel

पचनक्रिया सुधारते

बडीशेप खाल्ल्याने अन्न योग्य पद्धतीने पचायला मदत होते. त्यातील गुण पचन एन्झाइम्सची क्रिया वाढवतात. म्हणून जेवणानंतर ती दिली जाते.Fennel served in hotels reason

Benefits of eating fennel after food

गॅसचा त्रास कमी होतो

बडीशेपमध्ये असलेलं नैसर्गिक तेल पोटातील गॅस कमी करतात. त्यामुळे फुगणं आणि जडपणा जाणवणं कमी होतं. हे जेवणानंतर आरामदायक वाटण्यास मदत करतं.

Fennel served in hotels reason

तोंडाची दुर्गंधी दूर होते

मसालेदार आणि तेलकट जेवणानंतर दुर्गंधी येऊ शकते. बडीशेप खाल्ल्याने तोंडाला वास येत नाही. हे नैसर्गिक माउथ फ्रेशनरचं काम करतं.

Fennel seeds health benefits

एसिडीटी

बडिशेपमध्ये असलेले गुण एसिडीटीवर मात करतात. यामुळे छातीत जळजळ आणि आम्लपित्ताचा त्रास कमी करतात. म्हणून पोटात आराम वाटतो.

लाळेचा स्त्राव वाढतो

बडीशेप चघळल्याने लाळ तयार होते. लाळ पचनक्रियेला मदत करते आणि अन्न आतड्यांमध्ये पोहोचण्यास मदत होते. तसंच पचन चांगलं होतं.

Fennel served in hotels tradition

रोजच्या आहारासाठी फायदेशीर

दररोज थोडी बडीशेप खाल्ल्यास पचनसंस्था निरोगी राहते. हृदय, पचन आणि तोंडाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Fennel seeds hotel dining practice

Blouse Colors Slim Arms: ब्लाऊज घातल्यावर दंड जाड दिसतो? या रंगाचे ब्लाऊज वापरा, दंड दिसेल एकदम स्लिम

येथे क्लिक करा