Manasvi Choudhary
साडीचा परफेक्ट लूक हा ब्लाऊजच्या डिझाईनवर असतो. साडीचा लूक पूर्णपणे बदलण्यासाठी 'कॉन्ट्रास्ट ब्लाऊज' घालू शकता.
साडीच्या रंगापेक्षा वेगळा आणि हटके ब्लाऊज लूक करायचा असेल तर तुम्ही 'कॉन्ट्रास्ट ब्लाऊज' निवडू शकता.
जर तुमची साडी हिरवी असेल, तर गुलाबी ब्लाऊज निवडा. हिरव्या साडीवर लाल किंवा गुलाबी ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.
जर तुमची साडी ऑरेंज असेल, तर ब्ल्यू ब्लाऊज निवडा. ऑरेंज साडीवर ब्ल्यू ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.
जर तुमची साडी व्हाईट असेल , तर लाल ब्लाऊज निवडा. व्हाईट साडीवर लाल ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.
जर तुमची साडी पिवळी असेल, तर जांभळा ब्लाऊज निवडा. पिवळ्या साडीवर जांभळा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो.
साडीच्या मुख्य रंगापेक्षा, त्यातील काठ किंवा प्रिंटच्या रंगाचा ब्लाऊज शिवल्यास तो आपोआप कॉन्ट्रास्ट आणि स्टायलिश दिसतो.