भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी पोलिसांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गोळाबारप्रकरणी आता हिललाइन पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांची विभागीय चौकशी केली जाणार आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातील राजकीय परिस्थिती हाताळण्यात हिललाइन पोलीस कुठे कमी पडले? दोन्ही गटांचे समर्थक इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात कसे आले? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
अधिकाऱ्यांना राजकीय परिस्थितीचा अंदाज का घेता आला नाही? महेश गायकवाड आणि गणपत गायकवाड हे दोघेही एकाच दालनात असताना तेथे पोलीस अधिकारी का नव्हते?
पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीचे फुटेज इतक्या तातडीने माध्यमांमध्ये प्रसारित कसे झाले? असे प्रश्न विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात उपस्थित अधिकाऱ्यांची चौकशी केली जाणार आहे. (Latest News)
आमदार गणपत गायकवाड यांना आपणच गोळीबार केल्याचं कबूल केलं आहे. तसेच याबाबत पश्चाताप नसल्याचंही म्हटलं आहे. या प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांना अटक केली असून त्यांना न्यायालयाने १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटनेत जखमी झालेले शिवसेनेचे महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकीय वादातून हा गोळीबार झाल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. यासोबतच आता पोलिसांना सर्वच बंदुकीच्या लायसन्सची पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. ठाण्यात आतापर्यंत जवळपास ४ हजार जणांना बंदुकीचे लायसन्स देण्यात आले आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर उल्हासनगर-हिल लाईन पोसीस ठाण्यात अॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अंबरनाथमधील द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने गणपत गायकवाड यांच्यासह सात जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.