Shiv Sena Vibhag Pramukh Supari saam tv
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News: शिवसेना विभाग प्रमुखाला मारण्यासाठी दिली १० लाखांची सुपारी, उल्हासनगरमधील धक्कादायक प्रकार

Shiv Sena Vibhag Pramukh Supari : उल्हासनगरमधील शिवसेना विभागप्रमुख सुनील सिंग उर्फ कलवा आणि कारी माखिजा यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते.

अजय दुधाणे

Ulhasnagar News: उल्हासनगरात शिवसेना विभाग प्रमुखाला जीवे मारण्यासाठी १० लाखांची सुपारी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणात सुपारी दिलेल्या गुंडाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मात्र सुपारी देणारा आरोपी कारी माखिजा अजूनही फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, उल्हासनगरमधील शिवसेना विभागप्रमुख सुनील सिंग उर्फ कलवा आणि कारी माखिजा यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाले होते. याच वादातून कारी माखिच्या याने सुनील सिंग उर्फ कलवा यांना जीवे मारण्यासाठी सुनील शर्मा या गुंडाला सुपारी दिली होती.

याबाबत माहिती मिळताच सुनील सिंग यांनी उल्हासनगर (Ulhasnagar Crime) पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत गुंड सुनील शर्मा याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याची चौकशी केल्यानंतर कारी माखिच्या याने आपल्याला सुनील सिंग यांना मारण्यासाठी १० लाखांची सुपारी दिल्याचं त्याने कबूल केलं.

दरम्यान सुपारी देणारा कारी माखिजा हा अजूनही फरारच आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shiv Thakare : बिग बॉस विजेता शिव ठाकरेने गुपचूप बांधली लग्नगाठ; 'तो' फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गुडन्यूज

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ₹२००० साठी आताच करा हे काम, अन्यथा २२वा हप्ता विसरा

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं देवेंद्र फडणवीस यांना शायरीतून प्रत्युत्तर

ZP Elections : मिनी विधानसभेचं बिगुल वाजणार, दोन की एकाच एकाच टप्प्यात निवडणूक? वाचा लेटेस्ट अपडेट

Maharashtra Politics: अजितदादांचा पुणेकरांसाठी मोठा वादा, देवेंद्र फडणीस म्हणाले - 'घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातं'

SCROLL FOR NEXT