Uddhav Thackeray Birthday Saam TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंचा वाढदिवस रात्री १२ वाजता केक कापून साजरा; Video व्हायरल

काल रात्री ठीक बारा वाजता शिवसैनिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे -

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. काल रात्री ठीक बारा वाजता शिवसैनिक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. (Uddhav Thackeray's Birthday)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरी नंतर शिवसेनेला मोठे भगदाड पडले. काही जण ठाकरे आणि मातोश्रीला सोडून गेले तर काहीजण त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहिले. अशातच आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस विशेष लक्षवेधी ठरत आहे.

पाहा व्हिडीओ -

उद्धव ठाकरे यांना सदिच्छा देण्यासाठी आज मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची (Shivsainik) गर्दी होईल अशी अपेक्षा आहे. सलग दोन वर्षे कोरोना मुळे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता मात्र यावर्षी वाढदिवस जल्लोषात साजरा होताना दिसतोय. मातोश्रीबाहेर फुलांच्या आरसात धनुष्यबाण विशेष लक्षवेधी ठरत आहे तसेच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारे बॅनरबाजी देखील लक्ष वेधून घेत आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : कोर्टाने सांगूनही जंतर-मंतर परिसरातील बॅरिगेट्स पोलिसांनी काढले नाहीत

Weight Loss Food: वजन कमी करण्यासाठी काय खावं, काय टाळावं? आहारतज्ज्ञांचा सल्ला एकदा वाचा

High BP : तुमचा ब्लड प्रेशर नेहमीच वाढलेला असतो? डॉक्टरांनी सांगितलेले ३ सोपे उपाय नक्की करून पाहा

Blue Saree Designs: नवरात्रीनिमित्त महिलांसाठी निळ्या साड्यांचे खास कलेक्शन, 5 सुंदर डिझाईन्स

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

SCROLL FOR NEXT