uddhav thackeray  Saam tv
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; शिवसेना पुन्हा फोडली? बंडखोर खासदार वेगळा गट स्थापन करणार?

uddhav thackeray news : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे खासदार पुन्हा फुटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Vishal Gangurde

देशात राजकीय घडामोडींना वेग

ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याची चर्चा

ठाकरेंचे खासदार दिल्लीत लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार असल्याची चर्चा

देशात पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ममता बॅनर्जी यांचा पक्षातील २२ खासदार फुटले. त्यानंतर आता ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याची माहिती हाती आली आहे. ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी प्रतापराव जाधव यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांन उधाण आलं आहे.

देशातील काही राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर फोडाफोडीच्या राजकारणाला पुन्हा सुरूवात झाल्याचे दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे जवळपास ५८ आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर जवळपास २२ खासदारांनी बंडखोरी केली. पश्चिम बंगालनंतर आता महाराष्ट्रातही फोडाफोडी होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर काल उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीला मोजक्या खासदारांनी हजेरी लावली. तर काहींनी बैठकीला ऑनलाइन हजेरी लावली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार असल्याचे दावे फेटाळून लावले होते.

दुसरीकडे दिल्लीत आज ठाकरेंच्या खासदारांच्या गोटात हालचाली वाढल्या आहेत. ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी आज दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात वाऱ्यासारखी पसरली. वेगळ्या गटाची स्थापना करण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांच्या गोटात हालचाली वाढल्याची चर्चा आहे. ठाकरेंचे काही खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यात काल मातोश्रीवर आयोजित केलेल्या बैठकीला पक्षाचे ५ खासदार गैरहजर होते. त्यामुळे चर्चांना अधिक उधाण आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

SCROLL FOR NEXT