Uddhav Thackeray wanted to form alliance with the BJP Saam Tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray on Bjp Alliance: उद्धव ठाकरे यांनाही भाजपसोबत युती करायची होती, मात्र त्यांची एकच अट होती...

Satish Kengar

Deepak Kesarkar on Uddhav Thackeray: 'उद्धव ठाकरे यांनाही भाजपसोबत (BJP) युती करायची होती', असं वक्तव्य शिंदे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. आज माध्यमांशी बोलताना ते असं म्हणाले आहेत.

दीपक केसरकर म्हणाले आहेत की, ''उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करायची होती. मात्र त्यांची एकच अट होती की, पाच वर्षापर्यंत तेच महाराष्ट्राच्या (Maharashtra Political News) मुख्यमंत्रीपदी राहतील.''

ते म्हणाले, ''आमच्या सगळ्यांची मागणी होती की, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ सोडावी. मात्र त्यांनी तसं केलं नाही.'' बंडखोरी केल्यानंतरही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होतो आणि त्यांना सांगत होतो की, तुम्ही त्यांची साथ सोडा आम्ही परत येऊ, असंही केसरकर म्हणाले आहेत.  (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा डाव यशस्वी झाला नसता तर त्यांनी त्यांनी सर्व आमदारांना परत पाठवलं असते आणि स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली असती, असं बुधवारी दीपक केसरकर म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर एकच खळबळ माजली होती. यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

आज माध्यमांशी बोलताना ते म्हणाले आहेत की, 'संजय राऊत म्हणाले होते की 40 लोकांचे मुडदे पाडणार. शिंदे साहेबांचा अपमान झाला म्हणून ते शिवसेनेतून बाहेर पडले. मी नामर्दाकडून मरणार नाही मी स्वतः ला संपवणार असा बोलणारा आमचा नेता आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT