Uddhav Thackeray  Telegraph
मुंबई/पुणे

Uddhav thackeray : उद्याचा महाराष्ट्र बंद कसा असेल? उद्धव ठाकरे यांनी सविस्तर सांगितलं, VIDEO

Uddhav thackeray on maharashtra Bandh : महविकास आघाडीने पुकारलेला महाराष्ट्र बंद हा २ वाजपर्यंत असणार आहे. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असल्याचं म्हणत ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बदलापूर अत्याचार प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहे. बदलापुरातील घटनेच्या विरोधात राज्यभरात आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या घटनेनंतर राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बदलापुरातील घृणास्पद घटनेच्या विरोधात महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. महविकास आघाडीने पुकारलेला बंद हा २ वाजपर्यंत असणार आहे. उद्याचा बंद हा विकृती विरुद्ध संस्कृती असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका देखील केली.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

राज्यातील अस्वस्थतेमुळे उद्या बंद आहे. राजकीय कारणासाठी बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे.

शाळेत मुलगी सुरक्षित राहील का? असा आई-वडिलांना वाटतं. अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे.

उद्याचा बंद हा महविकास आघाडी आणि मित्रपक्षाचा असणार आहे. जात-पात धर्म सोडून सर्वांनी सहभागी व्हावे.

कडकडीत बंद असायला हवा. रुग्णवाहिका, वृत्तपत्र सुरू राहतील. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. सणाचे दिवस आहेत. त्यामुळे बंद हा दुपारी २ वाजेपर्यंत करावा.

सरकारला काही म्हणू दे. मी जनतेच्या बाजूने बोलत आहे.

केवळ निवडणुकांमध्ये जनतेने मत व्यक्त करावे, असे नाही. इतर वेळी पण जनता व्यक्त होऊ शकते.

प्रशासन वेळीच कामाला लागले असते तर हे घडलं नसतं.

उच्च न्यायालयाने सरकारला थोबडवले आहे. जनतेचे न्यायालय वेगळे आहे.

जेव्हा सर्व दरवाजे बंद असतात, तेव्हा जनतेचा दार खुले होते.

बंदचे यश अपयश हे संस्कृती आणि विकृतीवर राहणार आहे.

सरकारला दाखवून द्यायचे आहे.

लोकल, बस बंद ठेवावी, कारण संतापाचा बंद आहे.

सरकारच्या नेत्यांना पण मुली आहेत. बंदच्या मागून तुम्ही पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. बंदचा फज्जा उडवू देऊ नका. नाहीतर जनता तुम्हाला जागा दाखवेल. हा बंद तुमच्या कुटुंबासाठी पण आहे.

पोलिसांची महासंचालक महिला आहे. त्या पण लाडकी बहीण होऊ शकतात.

बाकी, मुख्यमंत्र्यांना राखी बांधायला जाऊ शकतात. कारण ते फक्त मत मागायला जातात.

स्वतःहून बंदमध्ये सहभागी व्हा, कारण तुमच्या मुलींसाठी हा बंद आहे.

कायदा जर आमचे रक्षण करत नसेल तर त्यांना त्यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

Dhananjay Munde vs Manoj Jarange: धनंजय मुंडेंचा जरांगेंना विरोध की अस्तित्वाचा संघर्ष?

SCROLL FOR NEXT