Shivsena Uddhav Thackeray Speech Saamtv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Speech: 'अब्दालीचे राजकीय वंशज अमित शहा', उद्धव ठाकरेंचा घणाघात, फडणवीसांवरही तोफ डागली; पुण्यातील सभेत जोरदार बरसले!

Shivsena Thackeray Group Melava Pune: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक, राज्यातील राजकारण तसेच विधानसभेच्या रणनितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी- शहांवर जोरदार हल्लाबोल केला.

Gangappa Pujari

पुणे, ता. ३ ऑगस्ट २०२४

आगामी विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी पुण्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा पुण्यामध्ये पार पडत आहे. जनतेला न्याय देणार, गद्दारांचा कडेलोट करणार या टॅगलाईनखाली पुण्यामधील गणेश कला क्रिडा मंडळ सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणूक, राज्यातील राजकारण तसेच विधानसभेच्या रणनितीवर भाष्य केले. यावेळी बोलताना ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह मोदी- शहांवर जोरदार हल्लाबोल केला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

"दोन दिवसांपूर्वी मी बोललो काहींना वाटलं मी त्यांना आव्हान दिले. मात्र मी कुणालाही आव्हान देत नाही. नादाला लागण्याइतके तुमची कुवत नाही. मी कोणत्याही व्यक्तीला नाही, पक्षाला बोलतोय, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली. तसेच मला पुणे वाचवायचं आहे, शाश्वत विकास करायचा आहे," असे म्हणत पुणेकरांना त्यांनी खास आव्हानही केले.

भाजपवर टीकास्त्र!

राममंदिराला गळती लागली, संसद गळायली लागली. ज्याने संसदेचे कॉन्ट्रॅक्ट घेतले होते तोच पुण्यामधील नदी बुजवत आहे, अशी माझी माहिती आहे. तुमचे सगळ गळतंय. पेपर लीक होतायेत, संसद गळतेय. याला गळती सरकार म्हणायचे नाही तर काय म्हणायचे. ⁠मी मुख्यमंत्री असताना पुण्याचे सुभेदार होते. त्यामुळे मी लक्ष दिले नाही. पण आता हिशोब करावा लागेल, असा थेट इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

अमित शहांवर टीकास्त्र!

"अहमद शहा अब्दालीचा राजकीय वंशज अमित शहा आले होते. पुण्यात येऊन भाषण करुन गेले. त्यांना संघाचे हिंदुत्व मान्य आहे का? चंद्राबाबु नायडु, नितीश कुमार हे काय हिंदुत्ववादी माणसं आहेत का? असा सवाल त्यांनी केला. तसेच आमचे हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व आहे. साधु संतांचे, महाराष्ट्राला पुढे नेणारे आमचे हिंदुत्व आहे, असं म्हणत कोर्टाला शेवटची विनंती करतो नाहीतर नाद सोडतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT