Uddhav Thackeray speech at Shiv Sena Dussehra rally : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर अत्यंत गंभीर आरोप केले. देशातील १३ कोटी नागरिकांचे मतदानाचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ताधाऱ्यांविरुद्ध उघडपणे बंड पुकारल्याचे ते म्हमाले. होय, आम्ही सत्ता बदलण्यासाठीच उभे आहोत, असे स्पष्ट शब्दांत ठणकावून सांगितले. देशातील लोकशाही आणि नागरिकांचे हक्क वाचवण्यासाठी आता गप्प बसणार नाही, म्हणूनच आम्ही हे राजकारण बदलण्यासाठी आणि सत्ता बदलासाठी उभे ठाकलो आहोत असेही ठाकरे म्हणाले.
१३ कोटी नागरिकांची नावे मतदार यादीतून काढली, मग ते सगळे बांगलादेशी आहेत का?
मतदार याद्यांमधील घोळावर आणि बोगस कारभारावर बोट ठेवत उद्धव ठाकरे म्हणाले, आपल्या देशातील तब्बल १३ कोटी नागरिकांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. मतदारांची नावे पद्धतशीरपणे यादीतून वगळली जात आहेत. तुम्ही म्हणता की बांगलादेशींना इथे राहण्याचा अधिकार नाही, मग याचा अर्थ असा का की ते १३ कोटी लोक बांगलादेशी आहेत? हिंमत असेल तर त्यांची नावे उघड करा, असे ठाकरे म्हणाले.
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला, मग ज्ञानेश कुमार यांचा का नाही?
ठाकरे म्हणाले, सध्या देशात अत्यंत बेदरकारपणे कारभार चालवला जात आहे. एका प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला, त्यांना तो द्यावाच लागला. भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवले गेले. मग जर निवडणुका आणि यंत्रणेमध्ये एवढे सगळे प्रकार सुरू आहेत, तर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा अजूनही का घेतला जात नाही? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
शस्त्रे घेऊन आलेले लोक दिसत नाहीत का? घात झाला असता तर काय?
टायगर श्रॉफवरील हल्ल्याच्या घटनेवर बोलताना उद्धव ठाकरे संताप व्यक्त केला. ते म्हणाले, टायगर श्रॉफवर हल्ला झाला आणि हा 'चमको' (एकनाथ शिंदे) नेता लगेच तिथे पळत गेला. पोलिसांनी तत्परता दाखवून आरोपी पकडले, याचे कौतुक करायचे का आणखीन काय करायचं? सुदैवाने तो तरुण (पोरगा) वाचला. कसल्या पद्धतीचे सरकार चालवता तुम्ही? पोलीस आणि इतर यंत्रणांनी बाकी सगळी कामे केली आहेत, पण गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरले आहेत. तुमच्या नाकाबंद्या कशासाठी असतात?
आमच्याकडे साधा वाद झाला की पोलीस लगेच हजर होतात, मग हे उघडपणे शस्त्र घेऊन आलेले लोक पोलिसांना दिसत नाहीत का? हे राज्यात शस्त्र घेऊन आले कसे? तुम्ही आरोपींना पकडले हे मान्य, पण जर एखादा मोठा घात झाला असता, तर कोणत्या तोंडाने तुम्ही यशाची टिमकी वाजवली असती? ते शस्त्र घेऊन आले तेव्हाच यंत्रणेला कळायला हवे होते आणि तेव्हाच त्यांना जागेवर रोखायला हवे होते. कुणालाच कसली लाज-लज्जा उरलेली नाही. असे ठाकरे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.