uddhav thackeray news  Saam tv
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray : अहो, तुमच्या बापाने मुंबई दिली नाही; उद्धव ठाकरेंकडून भय्याजी जोशींचा समाचार

Uddhav Thackeray latest Speech: उद्धव ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांच्यावर निशाणा साधला. त्यांचा घोटकोपरमधील वक्तव्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही

मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आरएसएसचे वरिष्ठ नेते भय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. भय्याजी जोशी यांच्या मुंबईवरील वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला. घाटकोपरमध्ये अनाजी पंत येऊन बडबडून गेले. म्हणाले, घाटकोपरची भाषा मराठी नाही. अहो, मुंबई तुमच्या बापाने दिली नाही, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भय्याजी जोशी यांच्यावर निशाणा साधला.

ठाकरे गटाचा ईशान्य मुंबईत कार्यकर्ता निर्धार मेळावा होत आहे. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

तुम्ही आता चवताळले आहात. आजच्या शिबिरामुळे आपला आवाज दिल्लीच्या कानाचे पडदे फाडून टाकणारा आहे. शिवसेना प्रमुख म्हणायचे, मी म्हणेन ती पूर्व दिशा. त्या कृतीने आपण राज्याला आणि देशाला न्यायचे आहे. शिबीरात अनेक विषय झाले. शिबीर असेच असले पाहिजे. काय करायचे हे सांगितले पाहिजे.

स्कोअर किती झाला? आपल्याला विरोधकांची दांडी उडवायची आहे. ही मॅच दुबईत सुरू आहे. पण याच्या आधीची मॅच दुबईत झाली, हिंदुस्तान पाकिस्तान, काही कार्टी येथून गेली होती. अनुराग ठाकूर पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसले. त्यांनी गावस्कर, ब्रॅडमन यांना शिकवले, ते देखील बसले होते. हेच मी किंवा आदित्य असता तर यांची पित्र नरकात गेली असती. हेच फेक नरेटिव्ह आहे. भाजपचे हिंदुत्व हेच फेक आहे.

बांगलादेश, पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचे आणि आम्हाला हिंदुत्व शिकवणार. ज्यांचा स्वतंत्र लढ्याशी काहीही संबंध नाही, त्यांच्या हातात देश गेला आहे. त्यांना स्वातंत्र्याची किंमत कशी कळणार. परवा अनाजी पंत जोशी येऊन गेले. घाटकोपरमध्ये अनाजी पंत येऊन बडबडून गेले. म्हणे, घाटकोपरची भाषा मराठी नाही. अहो, तुमच्या बापाने मुंबई दिली नाही.

मला गद्दारांनी प्रश्न केला. ते दाढी बुडवून आले. तुम्ही कुंभमेळ्याला गेला नाही? आम्ही मोहन भागवत यांचे फॉलोवर्स आहेत. पण ते गेले नाहीत. त्यामुळे आम्ही गेलो नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण. असं त्यांचं भाकड तत्वज्ञान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT