Uddhav Thackeray On Ambadas Davne Telegraph
मुंबई/पुणे

Uddhav Thackeray Video: षडयंत्र रचून अंबादास दानवेंना निलंबित केलं; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray On Ambadas Davne: विधान परिषदेत भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यावरून उद्धव ठाकरेंना माध्यमांशी संवाद साधताना भाजप आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

विधान परिषदेच्या सभापती निलन गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यावरुन उद्धव ठाकरेंनी सभापती आणि राज्य सरकारवर हल्लाबोल केला. अंबादास दानवे यांना निलंबित करणाऱ्यात आलंय. एकतर्फी निर्णय घेतला हे लोकशाहीला मारक आहे . दानवे यांना बाजू मांडायला द्यायला हवं होतं . ठरवून हे षडयंत्र रचून विरोधकला निलंबित केलं आहे. महाराष्ट्रची जनता डोळे उघडून हे पाहत आहे, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय.

राज्याच्या पावसाळी विधीमंडळाच्या अधिवेशनाचा चौथा दिवस चांगला वादाचा ठरला. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी भर सभागृहात एकमेकांना शिवीगाळ केली. त्याप्रकरणी सभागृह अध्यक्षांनी दानवेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यावरुन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

एखादा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा करणं अपेक्षित असतं.दोन्हीकडील बाजू ऐकणं आवश्यक असून ते लोकशाहीसाठी आवश्यक असतं. अंबादास दानवे यांची बाजू ऐकली गेली पाहिजे होती. जरी सभागृहाचे अध्यक्षांना निलंबन करण्याचा अधिकार असला तरी, बाजू ऐकणं आवश्यक होतं. अध्यक्षांनी एकबाजूने निर्णय घेणं आणि एकतर्फी निर्णय घेणं हे लोकशाहीसाठी घातक असतं.

हा लोकशाहीला मारक असलेला निर्णय आहे. आमच्याकडील कोणत्याच सदस्याला बोलून दिलं. जसे काही हे निलंबन ठरवूनच केलंय. एखादं षडयंत्र रचून एखाद्या विरोधी पक्षाला निलंबित करणं हे कदाचित महाराष्ट्रातील इतिहासात पहिल्यांदा झालं असेल.

विधान परिषदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी जे विधान केलं त्यावरील विधान मांडण योग्य नव्हतं. हीच भूमिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांनी घेतली होती. मुळात राहुल गांधी यांनी हिंदुत्वाचं अपमान केले नाही. आम्ही कोणीही हिंदुत्वाचा अपमान करणार नाही. त्यामुळे काल जो ठराव मांडण्यात येत होता, तो अपूर्ण माहिती घेऊन मांडला जात होता. जर ठराव मंजूर झाला असता तर तोही सभागृहाचा अपमान असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. कारण हा ठराव चुकीच्या आणि खोट्या माहितीवर आणला गेला असता. तर मग त्या सदस्यालाही निलंबित करणार आहात का असा सवालही ठाकरेंनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smit Machhar : मुंबईचा कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत! जीव धोक्यात घालून १७४ प्रवाशांचे प्राण वाचवले; नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav Viral Video: 'तुम्हाला बाहेर जावं लागेल...'; मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवला खरंच बाहेर काढलं?

Maharashtra News Live Update: प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरण; ठाणे क्राईम ब्राँचकडून ३ महिला ताब्यात

Phone overheating: फोन वारंवार गरम होत असेल तर काय करावं?

Congress: काँग्रेस भवनाबाहेर आढळला महिला नेत्याच्या नवऱ्याचा मृतदेह, डोक्यात गोळी घुसल्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT