Kirit Somaiya/Uddhav Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

उद्धव ठाकरेंनी वाट्टेल ती चौकशी करावी, वाधवानशी माझा दूरपर्यंत संबंध नाही - सोमय्या

अजित पवारांनी मला ईडीचा एजंट म्हटलं तर मला जरा ही लाज वाटणार नाही. पण संजय राऊत मला एजंट म्हणत असतील तर त्याला दमडीची किंमत नाही.

रोहिदास गाडगे

मंबई : आज शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपसह ईडीच्या अधिकाऱ्यांवरती अनेक गंभीर आरोप केले. तसंच त्यांनी नील सोमय्या आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले आणि राऊतांच्या याच आरोपांवरती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, माझी पत्रकार परिषद ही माझी आहे. मी त्यांच्या पत्रकार परिषदेची उत्तरं का देऊ? कारण माझा त्या प्रकरणाशी दमडीचा संबंध नाही. राकेश वाधवान (Rakesh Wadhwan) आणि माझा संबंध नाही. तीन हजार एकशे पानी पत्र लिहिल्याने तो पुरावा म्हणायचं का? त्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा दखल घेतली नाही.

पुढचं टार्गेट करणार कोण?

पत्रकारांनी त्यांना प्रश्न पुढचं टार्गेट कोण? असा प्रश्न विचारला असता विषय माफियागिरी करणारे घोटाळेबाज, जनतेच्या जीवाशी कोरोना काळात खेळतात ते आमचे टार्गेट असल्याचं सोमय्या म्हणाले तर मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी एसआरएचे गाळे ढापले. या गोष्टी कन्फर्म झाल्या आहेत. असा दावा सोमय्यांनी केला.

यशवंत जाधवांच्या (Yashwant Jadhav) विरोधात लवकरच गुन्हा दाखल होईल, जरंडेश्वर कारखान्याचा जप्त करून शेतकऱ्यांना लवकरच पुन्हा दिला जाईल. असा निर्णय न्यायालय घेईल असा विश्वास आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माझी वाट्टेल ती चौकशी करावी वाधवानचा माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही, हे मी अनेकदा सांगतोय, आता मी त्यावर उत्तर दिलं नाही, असं म्हणू नका.

ईडी चा पाचवा एजंट, मग आधीची चार एजंट कोण? अशी मिश्किल टिपणी सोमय्यांनी केली तसंच ED, CBI, उच्च असो की सर्वोच्च न्यायालयाने असो सर्वत्र किरीट सोमय्या जातोय. मी ज्या तक्रारी करतोय त्यात तथ्य आणि दम असतो. त्यामुळे त्यात कारवाई होते. न्यायालय त्यांना दाद देत नाही. मग न्यायालय पाचवा एजंट आहे असं सामना मध्ये लिहा, आहे का हिम्मत? किरीट सोमय्याने जी कागदपत्रे दिली त्याआधारे अनिल परबांचं रिसॉर्ट अनधिकृत आहे, असं स्पष्ट झालं.

सोमय्या ED चा एजंट होईल की जनतेचा एजंट होईल? जर सोमैय्याच्या तक्रारीवरून जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी आहे, हे सिद्ध झालं तर अजित पवारांनी मला ईडीचा एजंट म्हटलं तर मला जरा ही लाज वाटणार नाही. पण संजय राऊत मला एजंट म्हणत असतील तर त्याला दमडीची किंमत नाही. मी हसत हसत पुढे जाणार जितेंद्र नवलानी आठवत नाहीत, माझा त्यांच्याशी संबंध नाही.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT