Kalyan Dombivli Political News Saam tv
मुंबई/पुणे

Kalyan : ठाकरे गटाचे ‘बेपत्ता’ नगरसेवक शिंदेंसेनेच्या मंचावर, कुठे होते? विचारताच काढला पळ, कल्याणच्या राजकारणात नेमकं काय घडतेय?

Kalyan Dombivli Political News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक राहुल कोट अचानक कार्यक्रमात दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. माध्यमांपासून घेतलेल्या पळामुळे संशय अधिकच गडद झाला आहे.

Alisha Khedekar

  • ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता असल्याची चर्चा

  • राहुल कोट अचानक कार्यक्रमात दिसल्याने खळबळ

  • माध्यमांच्या प्रश्नांना टाळत कार्यक्रमातून काढता पाय

  • ठाकरे गटातील अंतर्गत राजकारणावर तर्क-वितर्क

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीपासून ठाकरे गटाचे चार नगरसेवक बेपत्ता असल्याने पालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे चारही नगरसेवक निवडून आल्यापासून सार्वजनिकपणे दिसत नसल्याने अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. दरम्यान, यातील कीर्ती ढोणे या पुन्हा ठाकरे गटात सक्रिय झाल्याचे स्पष्ट झाले असून उर्वरित तीन नगरसेवक म्हणजेच मधुर म्हात्रे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे अद्यापही माध्यमांपासून दूर असल्याचे चित्र आहे.

मधुर म्हात्रे आणि स्वप्नाली केणे हे घरी परतल्याचे सांगितले जात असले, तरी त्यांनी माध्यमांसमोर येणे जाणीवपूर्वक टाळले आहे. अशातच मोहने परिसरातील ठाकरे गटाचे नगरसेवक राहुल कोट हे महापौर हर्षाली चौधरी आणि भाजप आमदार निरंजन डावखरे यांच्यासोबत एका शाळेच्या कार्यक्रमात अचानक उपस्थित राहिल्याने सर्वांचं लक्ष वेधलं. शिंदेसेनेचे महापौर आणि भाजप आमदारांसोबत ठाकरे गटाच्या बेपत्ता नगरसेवकाची उपस्थिती पाहून राजकीय चर्चांना उधाण आलं.

माध्यम प्रतिनिधींनी राहुल कोट यांना “इतके दिवस तुम्ही कुठे होतात?” असा थेट सवाल विचारताच, “आता नको, नंतर बोलू” असं सांगत त्यांनी कार्यक्रमातून घाईघाईने बाहेर पडत माध्यमांसमोरून पळ काढला. त्यांच्या या वर्तणुकीमुळे संशय अधिकच गडद झाला असून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, कल्याण-डोंबिवली पालिकेत भाजपचे ५०, शिवसेनेचे ५३, ठाकरे गटाचे ११, मनसेचे ५, काँग्रेसचे २ आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचा १ नगरसेवक निवडून आला आहे. महायुतीच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या हर्षाली चौधरी महापौर, तर राहुल दामले उपमहापौर झाले आहेत. मात्र या सगळ्या राजकीय गणितांमध्ये ठाकरे गटाचे बेपत्ता नगरसेवक हा मुद्दा अद्यापही अनुत्तरितच आहे.

राहुल कोट यांच्या कार्यक्रमातील उपस्थिती आणि माध्यमांपासून घेतलेला पळ, यामुळे ठाकरे गटातील अंतर्गत घडामोडींबाबत तर्क-वितर्कांना अधिकच जोर आला असून, पुढील काळात या बेपत्ता नगरसेवकांवर ठाकरे गटाकडून काय भूमिका घेतली जाते, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rainy Season : पाऊस सुरू होताच लाईट का जाते? कारण काय तुम्हाला माहितीये?

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनवर काय निर्णय झाला?

Maharashtra News Live Update: पुणे मुंबई दरम्यानची एसटी वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत बंद

Shocking : भयंकर! पत्नीने पतीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, रूमचा दरवाजा बंद केला अन्...

महिनाभर भात खाणं बंद केल्यास शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT