Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांना शिवसेना मोठा झटका देण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणी समितीतून हकालपट्टी होणार?

रामनाथ दवणे साम टीव्ही मुंबई

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास 40 हून अधिक आमदारांसह बंड केल्याने शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर शिंदे यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. अशातच शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतून हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, संजय राऊत, सुधीर जोशी, अनंत गीते, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने 2018 मध्ये पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची निवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनाच अध्यक्षपदी निवडण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदावर आता गदा आली आहे. तसेच सुधीर जोशी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय कार्यकारणीतील एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे या रिक्त जागेवर नव्या नेत्याची निवड या राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत होईल अशी माहिती सूत्रांनी दिली. (Eknath Shinde Marathi News)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांची राष्ट्रीय कार्यकारणीतून हकालपट्टी केल्यानंतर ते फक्त शिवसेनेचे सदस्य म्हणून कार्यरत असतील. मात्र, त्यांच्याकडे कोणत्याही पदाचा आता पदावर नसेल असेही या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे एकनाथ शिंदे आमदारांसह गुवाहाटी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत.

माहितीनुसार एकनाथ शिंदे आता नवा गट स्थापन करणार असून या गटाचं नावही ठरवण्यात आलं आहे. 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट' असं या गटाचं नाव ठरलं असून लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाईल असं बंडखोर आमदारांकडून सांगण्यात आलं आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT