लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, गाफील राहू नका, असे आदेश ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. मातोश्रीवरील बैठकीत त्यांनी हे आदेश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मातोश्रीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या बैठकीला खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे, अनिल परब, रवींद्र वायकर आणि सुभाष देसाई उपस्थित होते. बैठकीत जवळपास दोन तास राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवरील बैठकीत शिवसेना पदाधिकारी तसेच नेत्यांसोबत सविस्तर संवाद साधला. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करताना ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले.
लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. त्यामुळे गाफील राहू नका, आजपासूनच निवडणुकीच्या तयारीला लागला, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेसह पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी महाराष्ट्रभर दौरे करण्याचा निर्णय घेण्यता आला.
सूत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिवाळीनंतर महाराष्ट्रात दौरे करणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी हे दौरे असणार आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे काही जिल्ह्यांमध्ये सभाही घेणार आहेत. ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.