Uddhav Thackeray on Maharashtra Bandh : बदलापूर येथील अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी (badlapur school abuse case) महाविकास आघाडीने उद्या (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) कसा असेल, याबाबतची माहिती दिली. शनिवारचा महाराष्ट्र बंद हा संकृती विरुद्ध विकृती असा आहे. त्यामुळे सर्वांनी या बंदमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केलेय. त्याशिवाय रेल्वे, बस आणि मेट्रो सरकारने बंद ठेवावं, असेही ठाकरेंनी सरकारला विनंती केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या पत्रकार परिषदेत नेमकं काय काय म्हटले, पाहूयात...
सणाचे दिवस आहेत. त्यामुळे शनिवारी होणारा महाराष्ट्र बंद हा दुपारी २ वाजेपर्यंत करावा, असे ठाकरेंनी सांगितले. घरापर्यंत विकृती येऊ नये म्हणून जनतेने जागे व्हावे. एकात्मतेचे विराट दर्शन दाखवावे, असे आवाहन ठाकरेंनी केले.
बदलापूरमध्ये झालेल्या दुष्कृत्याचा निषेध करण्यासाठी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीने जाहीर केला आहे. हा बंद राजकीय नसून विकृतीचा निषेध आणि बंदोबस्त करण्यासाठी आहे.
मी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो, ज्यांना ज्यांना संवेदनशील मन आहे; त्या प्रत्येकाने हा बंद पाळला पाहिजे. नराधमांना धडा शिकवला पाहिजे. ‘महाराष्ट्र बंद’ हा विकृतांच्या मनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आहे.
शनिवारचा महाराष्ट्र बंद हा संकृती विरुद्ध विकृती असा आहे. मुंबईतील लोकल, बेस्ट बससेवा बंद ठेवाव्यात, अशी विनंती वजा सूचना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केली आहे. कडकडीत बंद असायला हवा. रुग्णवाहिका, वृत्तपत्र सुरू राहतील, असे ठाकरे यांनी सांगितले.
दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
शाळेत मुलगी सुरक्षित राहील का ? असं आई वडिलांना वाटतं. अस्वस्थातेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. उद्याचा बंद हा महविकास आघाडी आणि मित्रपक्ष असणार.. जात पात धर्म सोडून सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ठाकरेंनी यावळी केले.
सरकारला काही म्हणू दे. मी जनतेच्या बाजूने बोलत आहे. केवळ निवडणुकींमध्ये जनतेने मत व्यक्त करावे असे नाही इतर वेळी पण जनता व्यक्त होऊ शकते. प्रशासन वेळीच कामाला लागले असते तर हे झालं नसतं.
उच्च न्यायालयने सरकारला थोबडवले आहे. पण जनतेचे न्यायालय वेगळे आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद असतात तेव्हा जनतेचा दार खुले होते. शनिवारच्या महाराष्ट्र बंदचे यश-अपयश हे संस्कृती आणि विकृतीवर रहाणार आहे, हे सररकारला दाखवून द्यायचे आहे..
बदलापूरमधील शाळेच्या मुख्याध्यापिकेने म्हटले आहे की सायकल चालवताना जखमा झाल्या असतील. उच्च न्यायालय ने पहावे की रोज आशा घटना घडत आहेत, असे ठाकरे म्हणाले.
आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही. पण तुम्ही पैसा देऊन नात्याला कलंक लावू नका .सुरक्षित बहीण महत्वाची आहे.
बंदचा फज्जा उडवू नका, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा
हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे, पोलीस महासंचालिका यांनी लाडकी बहीण व्हावे ,मध्ये येऊ नये, असे उद्धव ठाकरे म्हणाले. उद्याच्या बंदचा फज्जा उडवू नका, नाही तर जनता दोन महिन्यांनी तुमचा फज्जा उडवेल, असा इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.